IPLच्या एकाच टीमचे सहमालक, तरीही शाहरूखसोबत जुही चावला मॅच का बघत नाही ? म्हणाली – तो सगळा राग..
जुही चावला आणि शाहरूख खान यांची मैत्री खूप जुनी आहे, आता तर त्यांचे कुटुंबियही एकमेकांचे मित्र बनले आहेत. राजू बन गया जंटलमॅन, डर, यस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, वन 2 का 4, राम जाने, भूतनाथ, डुप्लिकेट अशा एकाहून एक हिट चित्रपटात शाहरुख जुहीने एकत्र काम केलं.
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि नामवंत अभिनेत्री जुही चावला या दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलंय. ते दोघे फक्त एकमेकांचे चांगले मित्रच नाही तर IPL मधील कोलकाता नाईड रायडर्स(KKR) या टीमचे को-ओनरही (सहमालक) आहेत. सध्या IPL 2024 चा जोश जोरात सुरू आहे. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जुही चावलाने एक मोठा खुलास केला आहे. खूप जुने मित्र आणि एकाच टीमचे सहमालक असूनही जुही कधीच शाहरुख सोबत आयपीएलची केकेआरची मॅच बघत नाही. तिने यामागचे एक मजेशीर कारणही सांगितले.
शाहरूख सोबत कधीच मॅच का पाहत नाही जुही ?
याबद्दल जुही म्बणाली की आयपीएलच्या मॅचेस नेहमीच थरारक, रोमहर्षक होतात. आपण सगळेच टीव्हीसमोर बसून या सामन्यांचा आनंद घेत असतो. जेव्हा आमच्या (केकेआर) टीमचा सामान असतो तेव्हा तो खेल बघायलाही खूप मजा येते, उत्कंठा वाटते आणि त्याचवेळी आम्हाला ताणही जाणवत असतो. पण शाहरूख खानसोबत मॅच पाहणं चांगल नाही कारण जेव्हा आमचा (केकेआर) संघ चांगली कामगिरी करत नाही तेव्हा तो त्याचा सगळा राग माझ्यावर काढतो. तेव्हा मी त्या म्हणते माझ्यावर रागावण्यापेक्षा, या सगळ्या गोष्टी तू टीमलाच सांग ना !
म्हणूनच आम्ही मॅच पाहण्यासाठी योग्य लोक (प्रेक्षक) नाहीयोत. मला वाटतं हे IPL च्या सर्वच मालकांसोबत होत असेल. आपली टीम खेळत असते तेव्हा सगळेच टेन्शनमध्ये असते, तेव्हा सर्वांनाच घाम फुटतो, असेही जुही म्हणाली
अनेक चित्रपटांत केलं एकत्र काम
जुही चावला आणि शाहरूख खान यांची मैत्री खूप जुनी आहे, आता तर त्यांचे कुटुंबियही एकमेकांचे मित्र बनले आहेत. गेल्या कित्येक दशकांपासून जुही -शाहरूख मित्र आहेत. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जुही ही शाहरूखचा मुलगा आर्यन याच्याही खूप क्लोज आहे. रिपोर्ट्सनुसार, आर्यन जेव्हा क्रूझ केस ( ड्रग्स) मध्ये अडकला होता तेव्हा जुहीनेच त्याची मदत केली होती.
राजू बन गया जंटलमॅन, डर, यस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, वन 2 का 4, राम जाने, भूतनाथ, डुप्लिकेट अशा एकाहून एक हिट चित्रपटात शाहरुख जुहीने एकत्र काम केलंय. त्यांची जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक मानली जाते.