Justin beibers : जस्टिन बिबरचा अर्धा चेहरा पॅरालाईज्ड! गंभीर व्हायरसमुळे अर्धांगवायू, शो रद्द केला

| Updated on: Jun 11, 2022 | 9:29 AM

जस्टीन बिबरच्या चेहऱ्याचा काही भाग पॅरालाईज झालाय. त्यानं एका व्हिडीओतून याबाबत माहिती दिली आहे. तसेच सर्व शो देखील त्याने रद्द केले आहेत.

Justin beibers : जस्टिन बिबरचा अर्धा चेहरा पॅरालाईज्ड! गंभीर व्हायरसमुळे अर्धांगवायू, शो रद्द केला
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकन गायक जस्टीन बिबरबाबत (Singer Justin Bieber) मोठी बातमी समोर येत आहे. बिबरच्या चेहऱ्याचा काही भाग पॅरालाईज (Paralyzed) झाला आहे. याची माहिती खुद्द जस्टीन बिबर याने त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले आहे की, आपल्याला Ramsay Hunt Syndrome नवाच्या आजाराचे निदान झाले आहे. त्यामुळे बिबरच्या चेहऱ्याचा काही भाग पॅरालाईज झाला आहे. सध्या जस्टीनवर उपचार सुरू आहेत. या आजारातून बरं होण्यासाठी वेळ लागणार असल्याने आपण कामातून ब्रेक घेत असल्याचे देखील त्याने यावेळी सांगितले. त्याने आपले सर्व शो रद्द केले आहेत. त्याने या व्हिडीओमध्ये आपल्या चहात्यांची देखील माफी मागितली आहे. माझी प्रकृती खूप गंभीर असल्याने मी शो करू शकत नाही, त्यामुळे मी काही शो रद्द केले आहेत. त्यासाठी मी चाहत्यांची माफी मागतो असे देखील बिबर याने म्हटले आहे.

बिबरने व्हिडीओमध्ये काय म्हटले?

28 वर्षीय अमेरिकन गायक जस्टीन बिबर याला Ramsay Hunt Syndrome नवाच्या आजाराचे निदान झाले आहे. या आजारामुळे त्याच्या चेहऱ्याचा काही भाग पॅरालाईज झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याले त्याने आपले सर्व शो रद्द केले आहेत. याबाबत बिबरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ प्रसारीत केला आहे. या व्हिडीओमध्ये बोलताना बिबर भावूक झाला आहे. त्याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना म्हटले आहे की, मला Ramsay Hunt Syndrome नावाच्या आजाराचे निदान झाले आहे. यामुळे माझ्या चेहऱ्याचा काही भाग पॅरालाईज झाला आहे. आपण पाहू शकता पॅरालेसीसमुळे माझ्या एका डोळ्याची हालचाल मंदावली आहे. मला निट हसता देखील येत नाहीये. माझ्या चेहऱ्याचा एक भाग पूर्णपणे पॅरालाईज झाला आहे. मला माहिती नाही या आजारातून सावरण्यासाठी किती दिवस लागणार आहेत. सध्या माझ्यावर उपचार सुरू असून मी कामातून ब्रेक घेतला आहे. मी शो देखील रद्द केले असल्याचे बिबर याने म्हटले.

हे सुद्धा वाचा

 

पत्नीलाही आला होता अर्धांगवायूचा झटका

जस्टीन बिबर याची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने कामातून ब्रेक घेतला असून, त्याने आपले शो रद्द केले आहेत. यामध्ये जस्टिस वर्ल्ड टूर टोरोंटो, वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्कमधील कार्यक्रमांचा सामावेश आहे. दरम्यान यापूर्वी देखील कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याने आपले शो रद्द केले होते. बिबरची पत्नी हेली यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याने हेली यांना देखील पॅरालेसीसचा झटका आला होता. आता बिबरला देखील याच आजाराचा सामना करावा लागत आहे.