Kailash Kher Life : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ – उतार येत असतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करताना एक क्षण असा येतो जेव्हा सर्वकाही संपलं असं आपल्याला वाटतं, पण खरंतर त्याचं क्षणापासून आयुष्यात येणारे दिवस प्रचंड सुखाचे आणि प्रसिद्धीचे असतात. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. आज कैलाश खेर (Kailash Kher) यांचे भारताताच नाही तर, परदेशात देखील चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आज अनेकांना कैलाश खेर यांनी गायलेली गाणी ऐकल्यानंतर प्रसन्न वाटतं, पण एक दिवस असा होता जेव्हा कैलाश खेर यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत कैलाश खेर यांनी त्यांच्या आयुष्याचं गणित सांगितलं आहे.
एका मुलाखतीत कैलाश खेर यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या संघर्षांबद्दल सांगितलं आहे. करियरच्या सुरुवातीला कैलाश खेर यांना अनेक गोष्टींचा सामना कराला लागला. आपण उत्तम गायक होऊ शकतो याची कल्पना देखील कैलाश खेर यांनी केली नव्हती. कैलाश खेर यांनी अनेक नोकऱ्या केल्या. जेव्हा कैलाश खेर २१ – २२ वर्षाचं होते तेव्हा त्यांनी एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला पण, त्यामध्ये कैलाश खेर यांना यश मिळालं नाही. (kailash kher net worth)
व्यवसायात मिळालेल्या अपयशानंतर कैलाश खेर पूर्णपणे खचले. त्यानंतर सगळ्या गोष्टींचा नात्याचा त्याग करुन पंडित होण्यासाठी कैलाश खेर ऋषिकेश याठिकाणी गेले. पण ऋषिकेशमध्ये देखील लोकांनी त्यांचा तिरस्कार केला. इतरांचे विचार आणि कैलाश खेर यांचे विचार प्रचंड वेगळे होते. त्यानंतर कैलाश खेर यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.
आयुष्यात आलेल्या संकटांना कंटाळून कैलाश खेर यांनी गंगा नदीमध्ये उडी मारली, पण त्याठिकाणी एका व्यक्तीने कैलाश खेर यांचे प्राण वाचवले. गंगा नदीच्या काठी ज्या व्यक्तीने कैलाश खेर यांचे प्राण वाचवले ते गायकाला प्रचंड ओरडले आणि जगण्याचा खरा हेतू सांगितला. त्यानंतर कैलाश खेर यांनी त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यामागचं कारण सांगितलं.
त्या व्यक्तीने कैलाश खेर यांना दुसरा जन्म दिला असं म्हणायला हरकत नाही. कारण तेव्हा गंगा काठी ती व्यक्ती नसती तर आज कैलाश खेर यांनी गायलेली गाणी आपल्याला ऐकताच आली नसती. आयुष्यातील ही घटना कैलाश खेर कधीही विसरू शकत नाहीत. कारण त्या ठिकाणी कैलाश खेर यांचा दुसरा जन्म झाला होता. या घटनेनंतर कैलाश खेर यांनी अनेक संघर्ष केले आणि संगीत विश्वात स्वतःची वेगळी ओळख तयार केली.