मुंबई : सासरे आणि सून यांचं नातं फार खास असतं. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते, तेव्हा सासरे वडिलांप्रमाणे सुनेची काळजी घेतात. सुनेला काय हवं, नको या प्रत्येक गोष्टीची काळजी सासरे घेतात. दरम्यान, टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये सासरे कसे सुनेची कशी काळजी घेतात हे काम्याने दाखवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांचा बॉन्ड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. काम्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा आहे.
काम्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचे सासरे दिल्लीतील कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी उपास सांगत आहेत. व्हिडीओमध्ये सासरे काम्याला स्कार्फ घालताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘जेव्हा सासरे दिल्लीतील थंडीपासून वाचण्यासाठी उपाय सांगतात…’ असं लिहिलं आहे. सध्या काम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
कोण आहे काम्याचा पती शलभ दांग?
काम्या पंजाबीने 2020 साली डॉ. शलभ दांगसोबत लग्न केलं. शलभ हेल्थकेयर इंडस्ट्रीशी संबंधीत आहे. काम्या तिच्या आरोग्यासंबंधी काही समस्यांबद्दल शलभला भेटली होती. भेटीनंतर त्यांच्या प्रेमाचा गुलाब बहरला. शलभसोबत काम्याचं दुसरं लग्न आहे. एवढंच नाही, तर शलभ यांचं देखील काम्यासोबत दुसरं लग्न आहे.
काम्याला 9 वर्षांची मुलगी आहे. तर शलभला ईशान हा 10 वर्षांचा मुलगा आहे. आता चौघं कुटुंब म्हणून आनंदाने राहतात. काम्याच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघे कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतात.
काम्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
नुकताच अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Punjabi) राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाली होती. भारत जोडो यात्रे दरम्यानचे फोटो देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. काम्याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक वर्ष अभिनय केल्यानंतर अभिनेत्री काम्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चरणसिंग सपरा यांसारख्या अन्य नेत्यांनी पंजाबींचे पक्षात स्वागत केलं.