कंगना बनली फायटर पायलट, या तारखेला रिलीज होणार बहुचर्चित ‘तेजस’

अभिनेत्री कंगना राणौतच्या बहुचर्चित 'तेजस' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या चित्रपटात कंगना एका पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. कधी रिलीज होणार हा चित्रपट, चला जाणून घेऊया...

कंगना बनली फायटर पायलट, या तारखेला रिलीज होणार बहुचर्चित 'तेजस'
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 6:03 PM

Kangana Ranaut Movie Tejas Release Date : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आता लवकरच फायटर प्लेन उडवताना दिसणार आहे. कंगनाच्या ‘तेजस’ या (Tejas movie) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कंगना देशासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर तेजस चित्रपटाच्या रिलीज डेटचा खुलासा करणारी पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटात देशासाठी जीवाची बाजी लावणाख्या एका पायलटची कथा दिसणार आहे.

आपल्या हवाई दलाच्या वैमानिकांच्या शौर्याला सलाम ! असा मेसेज लिहीत कंगनाने इन्स्टाग्रमावर एक पोस्ट शेअर केली आहे. तेजस हा चित्रपट 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कंगना रणौतने चित्रपटातील तिचा लूक देखील शेअर केला आहे. त्यातील एका छायाचित्रात कंगनाने एअरफोर्सचा युनिफॉर्म परिधान केलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत कंगनाचा ॲक्शन अवतार पाहायला मिळत आहे. हा चित्पट पाहण्यास चाहते खूप उत्सुक असून अनेकांनी या पोस्टवर कमेंट्सही केल्या आहेत.

या चित्रपटात कंगना रणौत एअरफोर्स ऑफिसर तेजस गिलची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर कंगनाही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे.

सध्या कंगना ‘इमर्जन्सी’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. याआधी ती ‘मणिकर्णिका’, ‘पंगा’, ‘थलाईवी’ आणि ‘धकड’मध्ये दिसली होती. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकले नाहीत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.