मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने पत्रकार-चित्रपट विश्लेषक राजीव मसंद, निर्माता करण जोहरच्या कंपनीत सामील झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंगना रनौतने यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये कंगना म्हणते, ‘बरं झालं त्यांनी पत्रकारितेचा मुखवटा काढून टाकला आणि करण जोहरच्या कंपनीत उघडपणे सामील झाले.’ राजीव मसंद यांची ‘धर्मा’मध्ये वर्णी लागल्यावर कंगना चांगलीच संतापली आहे (Kangana Ranaut Criticized film critics Rajeev Masand who join karan johar’s Dharma production).
कंगना रनौत पुढे लिहिते की, ‘राजीव मसंद यांनी माझ्याबद्दल आणि सुशांतसिंह राजपूत यांच्याबद्दल अत्यंत वाईट गोष्टी लिहिल्या. तो चांगल्या चित्रपटांची नकारात्मक समीक्षा लिहित असे. पत्रकार म्हणूनही ते करण जोहरच्या बाजूनेच होते. हे चांगले झाले की, त्यांनी पत्रकारिता सोडली आणि अधिकृतपणे करण जोहरच्या गटांत सामील झाले’
Rajeev wrote the most poisonous blind items about Shushant and me, he openly licked mediocre star kids and gave negative reviews to genuinely good films, even as a journalist he was always KJO minion. Good he left jurno facade and joined KJO officially ? https://t.co/Y9jkL9D9wU
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 15, 2021
कंगना (Kangana Ranaut) इतक्यावरच थांबली नाही, तर आणखी एक ट्विट करत कंगना म्हणाली की, ‘अशाप्रकारे चित्रपट माफियांनी सर्वत्र महत्त्वाच्या लोकांना अपहृत केले आहे. हे लोक एजंट / समीक्षक / पत्रकार / वितरक / पुरस्कार ज्यूरीपर्यंत सगळ्यांना सेट करतात. अशा प्रकारे ते आपल्या वैयक्तिक जीवनातदेखील हस्तक्षेप करतात. हे लोक आपल्यावर बंदी घालू शकतात आणि आपली प्रतिमा मलीन करू शकतात. यामुळे बरेच लोक मरतात आणि काही मोजकेच लोक यांच्या पुढ्यात टिकतात. म्हणूनच चित्रपटसृष्टीतही कठोर कायदे आवश्यक आहेत.’
This is how movie mafia hijacks key people in every place,agents/critics/journalists/distributors/award jury they plant their minions in your personal life to ruin you from every angle, they ban you n ruin your image, many succumb few survive. Need strict laws in movie industry. https://t.co/7ryXrTPoBm
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 15, 2021
राजीव मसंद (Rajeev Masand) यांनी पत्रकारितेला निरोप देऊन करण जोहरच्या कंपनीत सामील झाल्याची बातमी ट्विट करत कंगना रनौतने ही टिप्पणी केली आहे. राजीव मसंद आता करण जोहरच्या टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी ‘धर्मा कॉर्नरस्टोन’मध्ये काम करणार आहेत. या कंपनीत, तो सीओओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण जोहरने टॅलेंट मॅनेजमेंट व्हेंचर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या कंपनीत बंटी सजदेह करणबरोबर भागीदारी करणार आहे.
बर्याच काळापासून राजीव मसंद मनोरंजन विश्वात काम करत आहेत. चित्रपट विश्वात ‘समीक्षक’ म्हणून त्यांची ओळख आहे. ‘धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी’नेही राजीव मसंद कंपनीत रुजू झाल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘राजीव मसंद यांना इंडस्ट्रीमध्ये इतका दीर्घ अनुभव आहे की त्यांच्या या अनुभवाचा फायदा एजन्सीच्या दैनंदिन कामकाजासाठी होणार आहे.’
(Kangana Ranaut Criticized film critics Rajeev Masand who join karan johar’s Dharma production)
…म्हणून करण जोहरनं मागितली होती माफी