कंगनाची भावंडांवर गिफ्ट्सची खैरात, रंगोलीसह चौघांना चार कोटींचे आलिशान फ्लॅट्स

कंगनाने सख्ख्या भावंडासोबतच आत्ते-चुलत भावंडांना चंदिगढमध्ये चार फ्लॅट्स गिफ्ट केले. (Kangana Ranaut gifts flats )

कंगनाची भावंडांवर गिफ्ट्सची खैरात, रंगोलीसह चौघांना चार कोटींचे आलिशान फ्लॅट्स
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 1:55 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या भावंडांना आलिशान फ्लॅट गिफ्ट दिल्याची माहिती आहे. सख्खी बहीण रंगोली चंदेल, भाऊ अक्षत रनौत यांच्यासह चौघा भावंडांना कंगनाने फ्लॅट्स भेट दिले. कंगनाने चंदिगढमध्ये चार कोटी रुपयांचे एकूण चार फ्लॅट्स विकत घेतल्याचं बोललं जातं. (Kangana Ranaut gifts 4 flats to Rangoli Chandel and cousins in Chandigarh)

चौघा भावंडांना कंगनाचे गिफ्ट

कंगना आपली बहीण रंगोली आणि अक्षत यांच्याबाबत अत्यंत हळवी असल्याचं तिचे निकटवर्तीय सांगतात. कंगनाचं तिच्या कुटुंबावर आणि भावंडांवर निरतिशय प्रेम आहे. ती कायमच त्यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देते. प्रेमापोटीच तिने भावंडांवर गिफ्टचा वर्षाव केला आहे. सख्ख्या भावंडासोबतच आत्ते-चुलत भावांनाही तिने फ्लॅट्स गिफ्ट केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

चंदिगढमधील आलिशान भागात फ्लॅट्स

चंदिगढमधील अत्यंत पॉश भागात हे फ्लॅट्स असल्याची माहिती आहे. हा भाग चंदिगढ विमानतळापासून जवळ असून मॉल्स आणि रेस्टॉरंट्सही या परिसरात आहेत. “चंदिगढमध्ये स्वतःचं घर असावं, ही हिमाचल प्रदेशात राहणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते. कंगनानेही तिच्या भावंडांची ही मनिषा पूर्ण करण्यासाठी घर गिफ्ट दिली” असं तिच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.

कंगना-रंगोली, एकमेकींची सावली

सोशल मीडियावरील वादातही कंगना आणि रंगोली कायम एकमेकींची पाठराखण करताना दिसतात. कंगनावर नेटिझन्सने सोडलेलं टीकास्त्र असो किंवा ट्रोलिंग, रंगोली कायम तिच्या बाजूने उभी राहिली आहे. कंगनाची व्यावसायिक बाजूही रंगोली सांभाळते. तिच्या वांद्र्यातील कार्यालयावर बीएमसीचा हातोडा पडल्यापासून शिवसेनेने दिलेल्या चॅलेंजपर्यंत अनेक कठीण प्रसंगात रंगोली सावलीप्रमाणे कंगनासोबत राहिली.

दुसरीकडे, रंगोलीसोबत झालेल्या दुर्दैवी प्रसंगात कंगनाने तिची साथ दिली. त्यामुळे दोघी बहिणींचं नातं घट्ट झालं. त्यांचा धाकटा भाऊ अक्षत नुकताच विवाहबंधनात अडकला. त्याच्या लग्नात सगळ्या भावंडांनी एकत्र मजा केली होती. सोशल मीडियावर अक्षतच्या लग्नाचे फोटोही कंगनाने शेअर केले होते. आता ताईने दिलेल्या फ्लॅटमुळे अक्षतही आनंदात असेल. (Kangana Ranaut gifts 4 flats to Rangoli Chandel and cousins in Chandigarh)

संबंधित बातम्या : 

हंसल मेहता म्हणाले, सिमरन चित्रपट करणं ही माझी चूक; कंगना म्हणते “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का”

कंगना रनौतच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता, न्यायालयाने पाठवली नोटीस!

(Kangana Ranaut gifts 4 flats to Rangoli Chandel and cousins in Chandigarh)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.