Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामभक्त कधी खोटं बोलत नाही’, कोरोना रिपोर्ट विचारणाऱ्यांना कंगनाचे बेधडक उत्तर!

बॉलिवूड अभिनेता कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या चाहत्यांमधील बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. कंगना तिचे वक्तव्य कधीच मागे घेत नाही. यामुळेच आजकाल ती सोशल मीडियावर ट्रोल होत असते.

‘रामभक्त कधी खोटं बोलत नाही’, कोरोना रिपोर्ट विचारणाऱ्यांना कंगनाचे बेधडक उत्तर!
कंगना रनौत
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 4:05 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या चाहत्यांमधील बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. कंगना तिचे वक्तव्य कधीच मागे घेत नाही. यामुळेच आजकाल ती सोशल मीडियावर ट्रोल होत असते. पण अभिनेत्रीला ट्रोल होण्याची अजिबात भीती वाटत नाही. अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांना पोस्ट करत सांगितले होते की, तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण आता कंगनाने पुन्हा एकदा एक निवेदन जारी केले असून, ते चर्चेत खूप आले आहे (Kangana Ranaut gives an epic reply to trollers who asking for corona report).

कंगनाने 18 मे रोजी कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती आणि त्यासंबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला होता. त्यानंतर बर्‍याच लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता आणि काहींनी तर तिच्याकडे थेट कोरोना रिपोर्ट देखील मागितला. ते म्हणाले की, कंगना खोटे बोलत आहे. यावर कंगनाने आता सर्वांची बोलती बंद केली आहे.

कंगनाचे कडक उत्तर

वापरकर्ते कंगनाला जोरदार ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंगनाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तिला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यानंतर मंगळवारी अभिनेत्रीने सांगितले की, ती आता कोरोना मुक्त झाली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला परत घेरण्याचा प्रयत्न केला, ज्याला अभिनेत्रीने एक सडेतोड प्रतिसाद दिला आहे (Kangana Ranaut gives an epic reply to trollers who asking for corona report).

सर्वांना प्रतिसाद देत आता कंगनाने तिच्या कोरोना रिपोर्टचा फोटो क्लिक करुन इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. कंगनाने तिच्या स्टोरीवर रिपोर्ट शेअर केला आहे आणि त्यावर लिहिले आहे की, जे सर्व राक्षक माझा रिपोर्ट विचारत होते, कारण ते जसे आहेत, जगही त्यांना तसेच दिसते…’राम भक्त कधीच खोटे बोलत नाहीत’ श्रीराम.’

पाहा पोस्ट

कंगनाचे ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कंगनाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे आणि सांगितले की, ती कोणालाही घाबरत नाही.

कंगनाने व्हिडीओ केला पोस्ट

8 मे रोजी कंगनाने चाहत्यांना माहिती दिली की, तीला कोरोना झाला आहे. यानंतर, अगदी 10 दिवसानंतर म्हणजेच 18 मे रोजी कंगनाने तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे म्हटले आहे. ही माहिती देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘सर्वांना नमस्कार, माझा कोरोना रिपोर्ट नकारात्मक झाला आहे. मी या विषाणूचा कसा पराभव केला हे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. पण मला या विषाणूच्या फॅन क्लबला दुखावू नका, असे सांगितले गेले आहे. होय, हे खरं आहे की कोरोनाबद्दल काही सांगितले तर बरेच लोक रागावतात. सर्व चाहते आणि हितचिंतकांचे आभार आणि प्रेम.’

(Kangana Ranaut gives an epic reply to trollers who asking for corona report)

हेही वाचा :

‘जलसे’ जिवंत राहण्याची तळमळ, शाहिरीत नवे प्रयोग; वाचा, शाहीर इंगळे आणि त्यांची जडणघडण

अवघ्या 50 रुपयांत विकत होता सलमानचा ‘राधे’, लक्षात येताच दाखल झाला FIR

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.