Kangana Ranaut : आधी ट्विटरकडून कंगनाचं अकाउंट सस्पेंड, आता अवैज्ञानिक दावा केल्याने इन्स्टाग्रामकडून ‘ही’ कारवाई

अभिनेत्री कंगना रनौत इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय झाली आहे. मात्र आता ती इन्स्टाग्रामसोबत पंगा घेत असल्याचं चित्र आहे. (Kangana Ranaut: Kangana's account suspended from Twitter, now 'this' action from Instagram due to unscientific claim)

Kangana Ranaut : आधी ट्विटरकडून कंगनाचं अकाउंट सस्पेंड, आता अवैज्ञानिक दावा केल्याने इन्स्टाग्रामकडून 'ही' कारवाई
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 4:06 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असते. ती प्रत्येक विषयावर आपलं मत व्यक्त करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही, त्यामुळे अनेकदा ती वादातही अडकते. नुकतंच कंगनाचं ट्विटर अकाउंट कायमचं निलंबित करण्यात आलं आहे. ज्यानंतर ती आता इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय झाली आहे. मात्र आता ती इन्स्टाग्रामशी पंगा घेणार असल्याचं चित्र आहे. आता काही दिवसांपूर्वी कंगनाला कोरोना झालाय. याबद्दलची माहिती तिनं इन्स्टाग्रामवर दिली होती त्यात तिनं कोरोनाला एक सर्वसाधारण फ्लू असं म्हटलं होतं. आता कंगनानं दिलेल्या माहितीनुसार तिची पोस्ट इंस्टाग्रामनं हटवली आहे.

‘कोरोना एक किरकोळ फ्लू’ – कंगना रनौत

कंगनानं आपल्या पोस्टमध्ये कोरोनाला एक किरकोळ फ्लू असल्याचं वर्णन केलं होतं. आता तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आणि सांगितलं की तिची पोस्ट इन्स्टाग्रामवरुन हटवली गेली आहे. कंगनानं लिहिलं आहे – ‘इंस्टाग्रामनं माझी पोस्ट हटवली आहे, ज्यात मी अशी धमकी दिली होती की मी कोरोनाला संपवणार आहे. मी ट्विटरवर अतिरेकी आणि कम्युनिस्टांची सहानुभूती ऐकली होती मात्र कोरोना फॅन क्लब… मस्तच… मला इन्स्टाग्रामवर येऊन दोन दिवस झाले आहेत, असं दिसतंय की मी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ इथे टिकू शकणार नाही.

कंगनाची इन्स्टाग्राम स्टोरी

Kangana Ranaut

कंगना कोरोनाच्या विळख्यात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या जगभरात पुन्हा एकदा हाहाकार माजला आहे. देशात सतत वाढत असलेल्या कोरोना केसेस दरम्यान आता बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कंगनाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली ही माहिती तिनं स्वतः सोशल मीडियाच्या माधमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. कंगना रनौतनं ही माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ध्यानधारणा करताना दिसत होती. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘मागील काही दिवसांपासून मला खूप थकवा आला होता आणि माझे डोळे देखील जळजळत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती आणि आज त्याचा निकाल आला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. हे काळातच मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हते. आता मला माहित आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन.’

कंगनाचं ट्विटर अकाऊंट निलंबित

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून कंगना टीएमसीविरोधात विविध प्रकारचे ट्विट करत होती. भाजपला पाठिंबा देत कंगना उघडपणे टीएमसीवर निशाणा साधत होते. गँगरेपचा आरोप करत कंगनाने टीएमसीविरोधात ट्वीट केले होते, त्यानंतर ट्विटरने तिचे खाते निलंबित केले गेले होते. कंगनाचे खाते आता कायमचे निलंबित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Photo : ‘मेरी माँ…’ मराठमोळ्या कलाकारांचं ‘मदर्स डे’ सेलिब्रेशन, शेअर केले खास फोटो

Mother’s Day 2021 : ‘मदर्स डे स्पेशल’, बॉलिवूडमधील ‘या’ सिंगल मदर्सची नेहमीच होते चर्चा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.