अयोध्येत कंगनाने घेतली बागेश्वर बाबाची भेट; म्हणाली ‘आधी विचार केला की मिठी मारेन, पण..’

| Updated on: Jan 23, 2024 | 9:00 AM

अभिनेत्री कंगना रनौतने अयोध्येत बागेश्वर बाबांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करत तिने एक पोस्ट लिहिली आहे. कंगनाची हीच पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंगनाने लिहिलं, "छोट्या भावासारखं त्यांना मिठी मारण्याची मनात इच्छा होती, पण नंतर लक्षात आलं की.."

अयोध्येत कंगनाने घेतली बागेश्वर बाबाची भेट; म्हणाली आधी विचार केला की मिठी मारेन, पण..
Kangana Ranaut and Bageshwar baba
Image Credit source: Instagram
Follow us on

अयोध्या : 23 जानेवारी 2024 | अयोध्येतील मंदिरामध्ये रामचंद्राच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजकारणी, चित्रपट उद्याोगातील दिग्गज, अनेक ज्येष्ठ साहित्यिक, उद्याोजक, खेळाडू यांच्यासह विविध पंथांचे शेकडो साधुसंत असे सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित होते. हेमा मालिनी, कंगना रनौत, रजनीकांत, मधुर भांडारकर, सुभाष घई, सोनू निगम, आचार्य श्री श्री रविशंकर, मोरारी बापू आदी मान्यवर रविवारीच अयोध्येमध्ये दाखल झाले होते. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर कंगनाने तिथल्या साधूसंतांचीही भेट घेतली. बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्याही भेटीला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत कंगनाने भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या याच पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

बागेश्वर बाबा यांच्या भेटीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत कंगनाने लिहिलं, ‘पहिल्यांदा माझ्यापेक्षा कमी वयाच्या गुरुजींना भेटले. माझ्यापेक्षा ते जवळपास दहा वर्षांनी लहान आहेत. छोट्या भावासारखं त्यांना मिठी मारण्याची मनात इच्छा होती, पण नंतर लक्षात आलं की कोणी वयाने गुरू बनत नाही तर कर्माने गुरूचा मान मिळतो. गुरुजींचे चरणस्पर्श करत मी त्यांचा आशीर्वाद घेतला. जय बजरंगबली.’ कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

कंगनाची पोस्ट

हे सुद्धा वाचा

सोमवारी सकाळी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अनुपम खेर, कैलाश खेर, प्रसून जोशी, अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांसारख्या दिग्गजांचं अयोध्येत आगमन झालं. यावेळी मान्यवरांचं स्वागत रामनामाचा शेला आणि छोटी घंटा देऊन करण्यात आलं. आरतीच्या वेळी सर्व उपस्थितांनी घंटानाद केला. मंदिराच्या आवाराज अमिताभ बच्चन यांनी ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर भाजप खासदार रविशंकर प्रसाद आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचीही त्यांनी भेट घेतली. प्राणप्रतिष्ठेची विधी पूर्ण झाल्यानंतर सरोद वादक अमजद अली खान, अभिनेता अजय देवगण आणि गायिका श्रेया घोषाल यांच्यासह अनेक व्यक्तींनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.