Kangana Ranaut | कंगना राणौतला झालं तरी काय ? चक्क केले या दिग्दर्शकाचे कौतुक
Kangana Ranaut Post : कंगना राणौत नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडण्यापासून ती मागे हटत नाही.
Kangana Ranaut Post : बॉलीवुडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) सोशल मीडिया वर बरीच ॲक्टिव्ह असते. दररोज ती काही ना काही पोस्ट शेअर कर असते. तिच्या वक्तव्यांमुळेही ती बरीच चर्चेत असते. बऱ्याच वेळा इतरांवर टीका करणाऱ्या कंगनाने नुकतीच एक पोस्ट केली आहे. मात्र यावेळी तिने कौतुक केले आहे. तिच्या या पोस्टमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे बरेच कौतुक केले आहे. खास त्यांच्यासाठी तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
‘मी एक कलाकार म्हणून श्री. संजय लीला भन्साळी यांचे कौतुक करते. ते कधीच यश किंवा ग्लोरी यांचा दिखावा करत नाहीत. सध्या ते चित्रपटसृष्टीतील सर्वात खरे आर्टिस्ट आहेत. सिनेमावर इतकं प्रेम करणार्या दुसऱ्या कोणालाही मी ओळखत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते फक्त स्वतःच्या कामाकडे लक्ष देतात, ते क्रिएटिव्ह आहेत आणि प्रामाणिकही… ते एक लिव्हिंग लिजंड आहेत. माझं तुमच्यावर प्रेम आहे संजय सर’. अशा शब्दांत कंगनाने संजय लीला भन्साळी यांचे कौतुक केले आहे.
संजय लीला भन्साळी यांनी अनेक रोल ऑफर केले
गेल्या काही वर्षांत मला संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनकडून अनेक गाणी आणि भूमिका ऑफर करण्यात आल्या, परंतु काही कारणांमुळे मी ते करू शकले नाही. आताही जेव्हा मी त्यांना भेटायला त्याच्या घरी जातो तेव्हा ते माझ्याशी बसून बोलता. देवासारखे हळूवारपणे हसणारे, दयाळूपणे, मृदू बोलणारे SLB जी अगदी अप्रतिम आहेत, असेही कंगनाने पुढे नमूद केले आहे.
कंगनाला ऑफर केलं होतं गाणं
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत कंगना म्हणाली होती की संजय लीला भन्साळी यांनी तिला रामलीला चित्रपटासाठी एक गाणं ऑफर केलं होत. ते मला कलाकार म्हणून ओळखतात, पण तेव्हा काही कारणामुळे आम्ही एकत्र काम करू शकलो नाही. मला याचा नेहमीच पश्चाताप वाटेल.
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच चंद्रमुखी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे.