कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड, बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई
अभिनेत्री कंगना रनौतचे (Kangana Ranaut) ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचे (Kangana Ranaut) ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते (kangana ranauts twitter account suspended for violating rules).
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहे.
‘पंगा क्वीन’ पुन्हा वादात
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत बहुतेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि ट्वीटवरून वादात राहिली आहे. सामाजिक आणि राजकीय प्रत्येक विषयावर कंगना उघडपणे आपले मत व्यक्त करताना दिसते. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यानंतर कंगना टीएमसीविरोधात अनेक प्रकारचे ट्विट करत होती.
सोशल मीडियावर कंगना अनेकदा भाजपा आणि पंतप्रधानांच्या समर्थनार्थ दिसली. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगनाने टीएमसीला लक्ष्य केले आहे. कंगनाने नुकतेच एक धक्कादायक ट्विट देखील केले होते (kangana ranauts twitter account suspended for violating rules).
कंगनाने केले रावणाचे कौतुक
कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘मी चूक होते, ती रावण नाही. रावण तर सर्वोत्कृष्ट राजा होता, त्याने जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवला. तो एक महान प्रशासक, अभ्यासक आणि वीणावादक होता आणि आपल्या प्रजेचा राजा होता. ती एक रक्तपात करणारी राक्षस आहे. ज्या लोकांनी त्यांना मतदान केले आहे, त्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत.’
कंगनाचे भाजपला उघडपणे समर्थन
सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून कंगना उघडपणे भाजपा आणि पीएम मोदींच्या समर्थनात दिसत आहे. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगना टीएमसीला लक्ष्य करत होती. टीएमसीने एका भाजपा कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोपही अभिनेत्रीने केला होता. कंगनाच्या आरोपाची चर्चा होण्यापूर्वीच या अभिनेत्रीचे खाते निलंबित केले गेले आहे.
कंगनाच्या अकाऊंटवर निलंबनामुळे अभिनेत्रीचे चाहते खूप निराश झाले आहेत आणि सोशल मीडियावर निषेध व्यक्त करत आहेत. ट्विटरने कंगनावर केलेल्या या कारवाईमुळे काही लोक खूश आहेत, तर काही लोक चिडले आहेत. यापूर्वी कंगनाची बहीण रंगोली हिचेही ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले होते. कंगना रनौत हिला नुकतीच ‘पंगा’ आणि ‘मणिकर्णिका’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
(kangana ranauts twitter account suspended for violating rules)
हेही वाचा :
Video | ‘एक्स अँड नेक्स्ट’ जेव्हा दीपिका-आलिया एकत्र गातात रणबीरचं ‘चन्ना मेरेया’ गाणं, पाहा व्हिडीओ
कोरोनामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ, ज्येष्ठ अभिनेते म्हणतायत, आज बाळासाहेब असते तर….
Photo : मृत्यूच्या अफवेनंतर मीनाक्षी शेषाद्रीने शेअर केले फोटो, तुम्ही पाहिलेत?https://t.co/32zzObGrZH@MinaxhiSeshadri
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2021