Kangana Ranaut | ‘तेजस’साठी कंगनाची ‘धाकड’ तयारी सुरू, सोशल मीडियावर वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर!

कंगना तिच्या आगामी 'तेजस' या चित्रपटामध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकाची भूमिका साकारत आहे.

Kangana Ranaut | ‘तेजस’साठी कंगनाची ‘धाकड’ तयारी सुरू, सोशल मीडियावर वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर!
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 12:11 PM

मुंबई : सतत वादाच्या घेऱ्यात अडकलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये व्यस्त झाली आहे. मध्यंतरी तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ‘थलायवी’च्या चित्रीकरणावर परतत असल्याची माहिती दिली होती. आता तिने एक खास व्हिडीओ शेअर करत आगामी चित्रपट ‘धाकड’ आणि ‘तेजस’च्या चित्रीकरणासाठी तयार होत असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये कंगना ‘बॉक्सिंग’चे प्रशिक्षण घेताना दिसली आहे. (Kangana Ranaut Share video of training for next film tejas and Dhakaad)

कंगनाने तिच्या प्रशिक्षणाचा हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘मी माझ्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपट ‘तेजस’ आणि ‘धाकड’साठी ट्रेनिंग सुरू केली आहे. मी या चित्रपटांपैकी एकात सैनिक आणि दुसऱ्या चित्रपटात गुप्तहेरची भूमिका साकारत आहे. बॉलिवूडच्या थाळीत मी बरेच काही दिले आहे. परंतु, मणिकर्णिकाच्या यशानंतर मी बॉलिवूडला पहिली अ‍ॅक्शन हिरोईन दिली आहे’.

कंगना तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटामध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘तेजस’ आणि ‘धाकड’पूर्वी कंगना ‘थलायवी’ चित्रपटात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Kangana Ranaut Share video of training for next film tejas and Dhakaad)

‘थलायवी’चे चित्रीकरण पूर्ण

कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण रखडले होते. कलाकारदेखील कोरोनाच्या भीतीने चित्रीकरण टाळत होते. मात्र, आता अनलॉक सुरू झाल्यांनतर परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत असून अनेक कलाकारांनी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. अभिनेत्री कंगना रनौतदेखीलसात महिन्यांच्या ब्रेकनंतर ‘थलायावी’च्या सेटवर परतली आहे.

लॉकडाऊनमध्ये मनालीच्या घरी सुट्टी एन्जॉय करणाऱ्या कंगनाने चित्रीकरणासाठी सेटवर परतत असल्याची बातमी ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली केली होती. ‘प्रिय मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, 7 महिन्यांनंतर पुन्हा काम करणार आहे, माझा मोठा प्रोजेक्ट ‘थलायवी’साठी (Thalaivi) दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या काळात तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. मी काही सेल्फी शेअर करत आहे, आशा आहे की तुम्हाला आवडतील’, असे ट्विट करत कंगनाने काही खास फोटो शेअर केले होते. (Kangana Ranaut Share video of training for next film tejas and Dhakaad)

कोरोनामुळे प्रदर्शन लांबणीवर

ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ हा चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाल्याने, चित्रपटाचे चित्रीकरण वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही. तब्बल 7 महिन्यांनंतर आता चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रीकरण संपल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटली प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.

(Kangana Ranaut Share video of training for next film tejas and Dhakaad)

संबंधित बातम्या :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.