Kangana Ranaut | आक्षेपार्ह शब्दांची चर्चा, कंगनाने ट्विट तर संजय राऊतांनी मुलाखत सादर करावी, उच्च न्यायालयाचा आदेश!

कंगनाचे कार्यालय तोडताना बीएमसीने MRTP कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा दावा कंगनाच्या वकिलांकडून करण्यात आला.

Kangana Ranaut | आक्षेपार्ह शब्दांची चर्चा, कंगनाने ट्विट तर संजय राऊतांनी मुलाखत सादर करावी, उच्च न्यायालयाचा आदेश!
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 3:50 PM

मुंबई : मुंबई महापालिकेने, कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) हायकोर्टात धाव घेतली होती. तसेच महापालिकेकडे 2 कोटींची नुकसान भरपाई देखील मागितली होती. यासंदार्भात हायकोर्टात आज (28 सप्टेंबर) चौथी सुनावणी होती. आजच्या सुनावणीत कंगनाच्या याचिकेवर चर्चा झाली. या याचिकेत बीएमसीने आपल्याला पुरेसा वेळ दिला नसल्याचा दावा कंगनाने केला होता. याचबरोबर या सुनावणीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगानासाठी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांवर देखील चर्चा झाली (Kangana Ranaut Vs BMC and Sanjay Raut leagal fight at High Court).

कंगनाचे कार्यालय तोडताना बीएमसीने MRTP कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा दावा कंगनाच्या वकिलांकडून करण्यात आला. कुठलेही अनधिकृत बांधकाम तोडण्यापूर्वी सदरची नोटीस देण्यात येते. तसेच, त्यावर कारवाई करण्यापूर्वी एका आठवड्याचा वेळ दिला जातो. या दरम्यान सुनावणी होते, बांधकाम अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्यास दंड ठोठावून, ते बांधकाम अधिकृत करून घेण्यासाठीची एक प्रक्रिया असते. मात्र, कंगनाच्या बाबतीत असे झाले नाही. तिला वेळ न देताच बीएमसीने कारवाई केल्याचा युक्तिवाद कंगनाच्या वकिलांकडून करण्यात आला. हायकोर्टाने बीएमसीच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.

कंगनाला या संदर्भात नोटीसा पाठवल्या होत्या. परंतु, तिच्याकडून त्यासंदर्भात काहीच उत्तर आलेले नाही. तसेच, हे बांधकाम अधिकृत असल्याचा पुरावा म्हणून कुठलीही कागदपत्र अथवा नकाशा सदर करण्यात आला नाही. त्यामुळे सदर कारवाई करण्यात आल्याचे, मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले. (Kangana Ranaut Vs BMC and Sanjay Raut leagal fight at High Court)

संजय राऊतांच्या आक्षेपार्ह शब्दांची चर्चा

एका मुलाखती दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगनाविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते. ही मुलाखत त्यांना हायकोर्टात सादर करावी लागणार आहे. तसेच, या सगळ्या प्रकरणादरम्यान कंगनाने (Kangana Ranaut) केलेले ट्विट्सदेखील तिने कोर्टापुढे सादर करावे, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. या गोष्टी सादर केल्यानंतर पुढची सुनावणी होणार आहे.

नुकसानभरपाईची मागणी

मुंबई महापालिकेनने 24 तासांची नोटीस देऊन 9 सप्टेंबरला कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. इमारतीच्या आतील बांधकामावर हातोडा, तर बाहेरील बांधकामावर बुल्डोझर चालवला. मात्र, मालमत्तेच्या एकूण भागापैकी 40 टक्के भाग तोडण्यात आला असून, काही दुर्मिळ आणि मौल्यवान सामानाचे नुकसान झाल्याचा दावा कंगनाने केला होता. तसेच, बीएमसीकडे 2 कोटींची नुकसान भरपाई मागितली होती. मात्र, बीएमसीने (BMC) तिची मागणी मान्य करणे तर सोडाच, उलट उच्च न्यायालयाकडे अशी मागणी करणाऱ्या कंगनालाच दंड ठोठावण्याची विनंती केली होती.

(Kangana Ranaut Vs BMC and Sanjay Raut leagal fight at High Court)

संबंधित बातम्या : 

‘भरपाई तर सोडाच, पण निरर्थक याचिका करणाऱ्या कंगनाला दंड करा’, बीएमसी उच्च न्यायालयात आक्रमक

Kangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत

मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झालं तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही : कंगना रनौत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.