मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बुधवारी शिवसेना आमदारांना भावनिक साद घालत बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक शिवसेना आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे राजीनामा देऊ शकतात, असंही वृत्त आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranauts) एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2020 मध्ये कंगनाने उद्धव ठाकरेंविरोधात एक वक्तव्य केलं होतं, तेच वक्तव्य आता सोशल मीडियावर पुन्हा शेअर केलं जात आहे. कंगनाचं मुंबईतील ऑफिस महानगरपालिकेकडून उद्ध्वस्त केल्यानंतर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला होता.
या व्हिडीओत कंगना म्हणाली होती, “उद्धव ठाकरे, तुम्ही माझ्याकडून बदला घेतला असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही आज माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचा गर्व तुटणार हे नक्की. वेळ नेहमीच एकसारखी नसते हे लक्षात ठेवा.” कंगनाचा आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती म्हणतेय की, “जेव्हा जेव्हा एखादा पुरुष एखाद्या महिलेचा अपमान करतो तेव्हा त्याचा पराभव निश्चित असतो. जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा तो व्यक्तीचा विजय नसून लोकशाहीचा विजय असतो.”
Once #KanganaRanaut said
“Today my house is broken..
Tomorrow your pride will break!!!”#UddhavSarkarOnEdge#UddhavThackeray
pic.twitter.com/3YOiGfNVcs— ★ɬąཞą★ (@tariishh) June 22, 2022
Those words by #KanganaRanaut ?#MahaVikasAghadi #UddhavThackeray #ShivsenaMLA #BJP4Maharashtra pic.twitter.com/UslDlfwOtL
— Himalaya ?? (@Himalaya_72) June 22, 2022
शिवसेना आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक महाविकास आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक असून, महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं आहे, असं आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांना केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिलेला मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव शिंदे यांनी फेटाळला आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनाच झाला. शिवसैनिक भरडला गेला. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे व शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे, अशी भूमिका शिंदेंनी मांडली.