Kangana Ranaut : पंजाबच्या रस्त्यांवर कंगनाची शस्त्रक्रिया, व्हायरल फोटो बघून तुम्हालाही येईल हसू
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. (Kangana's surgery on the streets of Punjab, you will laugh when you see viral photos)
चंदीगड: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिनं या आंदोलनाबाबतीत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वक्तव्यं देखील केली आहेत. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात शीख समुदायानं मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे. आता या चळवळीत पंजाबचा गायक दिलजित दोसांजही सहभागी झाला आहे. या आंदोलनाविषयी दिलजित आता सतत सोशल मीडियावर ट्विट आणि पोस्ट शेअर करतोय.अशा परिस्थितीत आता कंगना आणि दिलजितचा वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (Funny Post about Kangana Ranaut)
अशा परिस्थितीत आता पंजाबचे लोक कंगनाची खिल्ली उडवत आहेत. त्यामुळे कंगनावर अनेक विनोदी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोस्ट बघून तुम्हाला हसू येईल हे नक्की. या फोटोमध्ये एका डमी रुग्णाचं ऑपरेशन सुरु आहे, ज्यावर कंगनाचे काही फोटो लावण्यात आले आहेत. हा फोटो आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या फोटोसोबत ‘पंजाबमधील रस्त्याच्या कडेला कंगना रनौतची मेंदू शस्त्रक्रिया… सभ्यतेने डोक्याचे आजार बरे करण्यासाठी बाजारपेठेतलं नवीन तंत्रज्ञान ‘ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण कंगनानं ट्विटरवर एक फोटो शेअर करत या फोटोमधील महिला 100 रुपयांसाठी प्रत्येक आंदोलनात सामील होत असल्याचा दावा केला होता. मात्र, ही माहिती चुकीची असल्यानं कंगनावर सोशल मीडियामधून विरोध दर्शवण्यात आला. या वादात अचानक दिलजित दोसांजनं एंट्री केली आणि कंगनाला खडे बोल सुनावले. कालांतरानं हा वाद मोठा झाला.