अवनीतची ती अदा अन् कंगना झाली फिदा ! सरळ फिल्ममध्येच ब्रेक दिला की राव
Kangana On Avneet Kaur : 'टीकू वेड्स शेरू' या अवनीत कौरच्या चित्रपटाचे सध्या बरेच कौतुक होत आहे. चित्रपटाच्या या यशामुळे कंगना राणौतही खूप खुश आहे. या चित्रपटासाठी अवनीतची निवड कशी केली ते कंगनाने नुकतंच सांगितलं.
Kangana Ranaut On Tiku Weds Sheru : ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाच्या यशामुळे अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या खूप आनंदी आहे. अवनीत कौर (Avneet Kaur) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) या दोघांनीही चित्रपटात उत्तम अभिनय केला असून अवनीतच्या कामामुळे खुद्द कंगनाही खूप प्रभावित झाली आहे. टिकूच्या भूमिकेसाठी तिने अवनीत कौरची कशी निवड केली याचा खुलासा कंगनाने नुकताच केला. अवनीत कौरची अशी कोणती गोष्ट होती जी तिला आवडली, ते कंगनानेच सांगितले,
खरंतर ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटासाठी कंगना एक अशी मुलगी होती, जी छोट्या शहरातून आली असेल पण तिची स्वप्न मोठी असतील. तिला या भूमिकेसाठी चेहऱ्यावर निरागसता आणि भोळेपणा हे दोन्ही हवं होतं. पण अशा मुलीचा खूप शोध घेऊनही तिला कोणीच सापडली नाही. या चित्रपटासाठी अशी मुलगी शोधण्याबाबत कगंनाने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबराशी देखील चर्चा केली होती.
View this post on Instagram
त्याचवेळी अजय धामा या कंगनाच्या जवळच्या मित्राने तिला अवनीत कौरचा फोटो पाठवला. अवनीतचा चेहरा पाहून कंगनाचा शोध थांबला. ती या भूमिकेत फिट्ट बसेल, असं कंगनाला वाटलं. चित्रपटातील टिकूच्या भूमिकेसाठी कंगनाला जो निरागसपणा हवा होता, तो तिला अवनीतच्या चेहऱ्यावर दिसला. नंतर कंगनाने अवनीतच्या अनेक ऑडिशन्स घेतल्या आणि तिला चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी फायनल केले.
खुद्द कंगना राणौतच्या चित्रपटात काम केल्यामुळे अवनीत कौरही खूप उत्साहित आहे. कंगनाने केलेली स्तुती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, अशा शब्दांत अवनीतने तिच्या भावना व्यक्त केल्या. माझ्या अभिनय कौशल्यावर कठोर परिश्रम करण्यासाठी ती (कंगना) मला शक्ती आणि प्रेरणा देते, असेही अवनीतने सांगितले.
कंगनाची निर्मिती असलेल्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. OTT वर चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. अवनीत कौरने 2010 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’मधून नृत्य क्षेत्रात पाऊल ठेवले. यानंतर तिने अनेक डान्स शोमध्ये आणि मालिकांमध्येही काम केले आहे.