Video: कपिल शर्मा फिरकी घ्यायला गेला अन् तोंडावर पडला, प्रेक्षकानं कोण आहे ते सांगितलं तेव्हा वरुण धवनही सावध बसला!
नी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम कपिल शर्मा आणि त्याच्यातील विनोदी कलाकारांमुळे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये येणारे प्रेषकही कार्यक्रमामध्ये आलेल्या अनेक कलाकारांना थेट प्रश्न विचारतात, प्रेषक प्रश्न विचारताच कपिलही त्यांची त्याच्या स्टाईलने तो फिरकी घेतो.
मुंबईः सोनी टीव्हीवरील (Sony TV) द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) हा कार्यक्रम कपिल शर्मा आणि त्याच्यातील विनोदी कलाकारांमुळे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये येणारे प्रेषक हे कार्यक्रमामध्ये आलेल्या अनेक कलाकारांना थेट प्रश्न विचारतात, प्रेषक प्रश्न विचारतानाच कपिल शर्माही त्यांची त्याच्या स्टाईलने तो फिरकी घेतो. प्रेषकानाच प्रतिप्रश्न करून त्याच्यातील विनोदाला एका उंचीवर घेऊन जातो. सध्या कपिल शर्मा कार्यक्रमातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओ कपिल शर्मा समोरच्या प्रेषकाची फिरकी घेताना तो स्वतःच तोंडावर पडला आहे. आणि त्यानंतर सावध होऊन त्यांना कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रेषकाचे हसत हसत स्वागत केले आहे, तर बरोबर असलेले सगळे कलाकार मात्र लगेच सावध होऊन बसले आहेत.
द कपिल शर्मा शो मध्ये सी. टी. पांडये नावाचे गृहस्थ प्रेषक म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांना स्टेजवरील कलाकारांना काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून त्यांनी माईक घेऊन ते ज्यावेळी कपिल शर्माला म्हणतात, माझं नाव सी. टी. पांड्ये आहे, त्यांच्या या नाव सांगण्यावरून कपिल त्यांची फिरकी घेण्यासाठी विनोद करतो. त्यांच्या नाव सांगण्यावरून आणि कपिलच्या विनोदी पंचवर कलाकारांसह सगळे हसत कपिलाच्या विनोदीबुद्धील दाद देतात.
मजा सबके साथ आता है
कपिलच्या विनोदीपणाला दाद देत असतानाच प्रेषक सी. टी. पांडये म्हणतात, मजा सबके साथ आता है, या त्यांच्या वाक्यवर कपिल आपले हात धुऊन घेतो, त्यांच्यावर आणखी विनोद करायचा म्हणून बाया सरसवून आणि पुढचा विनोद करतो. मजा सबके साथ आता है या वाक्याला कार्यक्रमातही हश्या पिकाला आहे. कपिललही मजा घेत मजा मजा म्हणत त्यांची फिरकी घेतो आणि सहभागी झालेले पांड्ये नावाचे प्रेषकही तितक्याच हसत हसत त्या सर्वांना दाद देतात. सोनी टीव्हीवरचा हा व्हिडिओ असला तरी सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने त्यामध्ये आणखी मिरचमसाला लावला आहे. त्यामुळे तो आणखी मजेदार झाला आहे. बॉलीवूडमधील अनेक विनोदवीरांच्या चित्रपटातील छोटे छोटे व्हिडिओ याला जोडले आहेत. अक्षय कुमार, गोविंदा, राजपाल यादव यासारख्यांच्या व्हिडिओनी ही व्हिडिओ आणखी मजेदार झाला आहे. सी. टी. पांडये आपले नाव सांगून कपिलची रिअॅक्शन येईपर्यंत तेही थांबले आहेत. आणि कलाकारही त्यांनी रिअॅक्शन देत आहेत. सी. टी.पांड्ये नावावरून कपिल शर्मा रिअॅक्शन देतो आणि कहां मजा ले के आए ओ म्हणत कपिल पुन्हा हश्या पिकवतो. प्रेषक आणि पांडयेही मनमुरादपणे हसून घेतो. तेवढ्यात वरुण धवन सगळा हशा निवळल्यावर त्यांना तो काय म्हणतो आणि त्यांनी त्याच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानंतर कपिल शर्मा कार्यक्रमामध्ये आलेल्या कलाकारांची रिअॅक्शन बघण्यासाठी हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे, मग आणखी मजा येते.
संबंधित बातम्या
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आर्या आंबेकरचं खास गाणं ‘भरली उरा मधी’ प्रेक्षकांच्या भेटीला
काय घालायचं ज्याचा त्याचा प्रश्न, दिशा पाटनीच्या बिकिनी अवताराला तुम्ही म्हणणार, नार गुलजार!