Kapil Sharma : ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज, नव्या कलाकारांचीही एन्ट्री होणार!

'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालाय. काही दिवसांपूर्वी हा शो ऑफ एयर करण्यात आला होता. नव्या शोमध्ये काही नवे क्रिएटिव्ह लोक दिसतील, अशी माहिती कपिलने दिली आहे.

Kapil Sharma : 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज, नव्या कलाकारांचीही एन्ट्री होणार!
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 10:40 PM

मुंबई : कॉमेडियन कपिश शर्मा आपला कॉमेडी चॅट शो ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालाय. काही दिवसांपूर्वी हा शो ऑफ एयर करण्यात आला होता. नव्या शोमध्ये काही नवे क्रिएटिव्ह लोक दिसतील, अशी माहिती कपिलने दिली आहे. शो मध्ये आधीपासूनच कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंह, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरन सिंह आहेत. अशावेळी कपिलला नव्या सिजनमध्ये अधिक कलाकार आणि स्क्रिप्ट रायटर्स जोडले जाण्याची आशा आहे.(The Kapil Sharma Show will launched with new vast and script writers)

नवं टॅलेंट, नवे कलाकार जोडले जाणार

द कपिल शर्मा शो मध्ये नवं टॅलेंट, नवे कलाकार आणि नवे स्क्रिप्ट रायटर्सचं स्वागत करण्यासाठी मी उत्साहीत आणि आनंदी आहे. एन्टरटेन्मेंटसाठी खरी इच्छा दाखवणारे आणि समान विचारधारा असलेले टॅलेंटेड लोकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे, असं कपिल शर्माने म्हटलंय. कपिल शर्मा शोचं प्रॉडक्शन सलमान खान टेलीव्हिजन आणि Banijay Asia कडून केलं जातं.

सलमान खान टेलीव्हिजनचे सीईओ नदीम कोरीशी यांनी सांगितलं की, ‘कपिल शर्मा आणि त्यांच्या शोचे अन्य कलाकार देशभरात या शोमुळे ओळखले जातात. आम्ही प्रेक्षकांना काही नावीन्यपूर्ण आणि रोमांचक देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. टीमचे आताचे आणि नव्याने जोडले जाणाऱ्या सर्व लोकांचा उद्देश्य हा फक्त मनोरंजन असणार आहे’.

कपिल शर्मा शो अचानक बंद

भारतातील लोकप्रिय शोपैकी एक असणारा ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma Show’) 31 जानेवारीपासून बंद झाला आहे. 1 फेब्रुवारीला शो टिव्हीवर दाखवण्यात आला नाही. याबद्दल ‘द कपिल शर्माच्या शोमधील कलाकारांनी अगोदरच कल्पना दिली होती. मात्र, प्रेक्षकांकडून निरोप घेताना कपिलने कोणताही फिनाले ठेवला नाही यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतू असेही सांगितले जात आहे की हा शो परत एकदा टीव्हीवर येऊ शकतो. पण यामध्ये शोचे जुनेच भाग दाखवले जातील. कपिलच्या शो अचानक बंद झाल्यामुळे बरेच प्रश्नही निर्माण झाले आहेत. दरम्यान, एका चाहत्याने कपिलला शो बंद होण्याचे कारण विचारले होते, त्यावेळी कपिल म्हणाला होता की, लवकरच आम्ही पुन्हा एकदा पालक बनणार आहोत त्यामुळे मला माझ्या पत्नीला वेळ द्यायचा आहे.

इतर बातम्या :

Disha Patani | सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर करताच ट्रोल झाली दिशा पाटनी, पहा काय म्हणाले नेटकरी…

Gauri Khan | गौरी खानचा ग्लॅमरस अंदाज, शाहरुख खानच्या पत्नीचे ‘हे’ फोटो पाहून चाहतेही म्हणाले ‘व्वा!’

The Kapil Sharma Show will launched with new vast and script writers

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.