पहिल्या चित्रपटासाठी करण जोहरने घेतले फक्त 11 रुपये, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा उडाला होता धुव्वा…

Karan Johar Birthday : निर्माता - दिग्दर्शक करण जोहरचा आज (२५ मे) वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी करण त्याच्या आगामी चित्रपटाविषयी एक महत्त्वाची घोषणा करणार आहे. बऱ्याच दिवसांनी करण पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसणार आहे.

पहिल्या चित्रपटासाठी करण जोहरने घेतले फक्त 11 रुपये, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा उडाला होता धुव्वा...
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 9:41 AM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा आज (२५ मे) वाढदिवस आहे. करण जोहर (Karan Johar) 51 वर्षांचा झाला आहे. या प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉक्स ऑफिसवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ते कुछ कुछ होता है पर्यंत, करणच्या ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटांनी अनेक विक्रमच मोडले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलची एक रंजक गोष्ट जाणून घेऊया. अनेकदा पडद्यामागे असणार्‍या करण जोहरने चित्रपटात अभिनयही केला होता. केवळ 11 रुपयांत त्याने मोठ्या पडद्यावरील खलनायकाची भूमिका साकारली होती, हे तुम्हाला माहीत आहे का ?

करण जोहरने 2013 मध्ये पहिला चित्रपट साईन केला होता. रणबीर कपूरच्या बॉम्बे वेल्वेटमध्ये करणने नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप करत होते. अनुराग कश्यप आणि करण जोहरची मैत्री कोणापासून लपलेली नाही. अशा परिस्थितीत जेव्हा अनुरागने करणला चित्रपटात खलनायकाची भूमिका करण्याची विनंती केली. तेव्हा करणही अनुरागला नकार देऊ शकला नाही आणि त्याने लगेचच चित्रपटात काम करण्यासाठी संमती दिली. इतकेच नव्हे तर करण जोहरने अनुराग कश्यपकडून चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी केवळ 11 रुपये घेतले होते.

फ्लॉप झाली भूमिका

मात्र, करणचे हे अभिनयातील पदार्पण चित्रपटासाठी खूप महागडे ठरले आणि बॉक्स ऑफिसवर बॉम्बे वेल्वेटला चांगलाच फटका बसला. आज केवळ प्रेक्षकच नाही तर अभिनेता, दिग्दर्शक आणि खुद्द करण जोहरही यामुळे खूप ट्रोल होतात.

खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी होता उत्सुक

चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी करण जोहरनेही एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली होती. ज्यामध्ये करणने लिहिले की, “मी बॉम्बे वेल्वेटच्या शूटिंगसाठी श्रीलंकेला जात आहे. कॅमेऱ्याच्या मागे असलेली व्यक्ती आता कॅमेऱ्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे. मी या चित्रपटात पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार नाही. मी चित्रपटात खलनायकाची मुख्य भूमिका साकारणार आहे, असेही त्याने नमूद केले होते.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्येही केले होते काम

करण जोहर याआधी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात काम करताना दिसला होता. बऱ्याच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात करणने शाहरुख खानच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर करणने बॉम्बे वेल्वेटमधून पडद्यावर प्रवेश केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.