मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आजकाल भीषण स्वरुप धारण करताना दिसत आहे. दररोज लाखो लोकांना या कोरोना विषाणूची लागण होत आहे. या विषाणूमुळे किती तरी निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकांमध्ये भीती वाढत असताना कोरोनाची भीषण परिस्थिती पाहून काही सेलेब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहरही (Karan Johar) या यादीमध्ये सामील झाला आहे (Karan Johar Dharma production social media pages dedicate to corona vaccination information).
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेपोटीझममुळे बराच काळ वादात सापडला होता. अलीकडेच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना 2’ मधून आऊट केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. पण, या वादाच्या वलयाला बाजूला सारत करण जोहर लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
धर्मा प्रोडक्शन्सची सोशल मीडिया पेज आता कोरोना विषाणू संबंधित लसीकरण प्रक्रिया आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकतेच्या माहितीसाठी वापरली जातील. धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या वतीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या सामाजिक व्यासपीठाचा विस्तार करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.
‘धर्मा’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की, आपल्याला कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेसंदर्भात काही शंका, प्रश्न किंवा मदत हवी असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची मानसिक आरोग्य समस्या असल्यास आणि त्यासाठी तुम्हाला मदत हवी असेल तर ते पूर्ण करण्यासाठी टीम युवा आणि धर्मा टीम प्रयत्न करेल (Karan Johar Dharma production social media pages dedicate to corona vaccination information).
कोरोना काळात केवळ धर्माच नाही तर यापूर्वी, जॉन अब्राहम, सलमान खान ते सोनम कपूर, भूमी पेडणेकर आणि इतर अनेक कलाकार मदत करत आहेत. हे सेलेब्स लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत.
करण जोहर पुन्हा एकदा वादात सापडला आहे. अभिनेता कार्तिक आर्यन नुकताच धर्मा प्रोडक्शनच्या ‘दोस्ताना 2’ मधून आऊट झाला आहे. ज्यानंतर करण या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी दुसर्या कलाकाराच्या शोधात आहे. काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती, करण जोहरने या चित्रपटासाठी अक्षय कुमारची मदत मागितली आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
(Karan Johar Dharma production social media pages dedicate to corona vaccination information)
Video | ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना…’, कीर्तीचा हा डान्सिंग अंदाज पाहून चाहतेही म्हणाले वा!