Karan Johar | दीपिका आणि रणवीरला पाहून करण जोहर याच्या डोळ्यात पाणी, थेट म्हणाला…

| Updated on: Oct 26, 2023 | 1:27 PM

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी मुंबईच्या अत्यंत आलिशान भागात आलिशान असे घर खरेदी केले. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे नुकताच मोठे खुलासे करताना दिसले.

Karan Johar | दीपिका आणि रणवीरला पाहून करण जोहर याच्या डोळ्यात पाणी, थेट म्हणाला...
Follow us on

मुंबई : करण जोहर हा गेल्या काही दिवसांपासून त्याचा शो कॉफी विथ करण सीजन 8 (Koffee With Karan 8) मुळे जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये नेहमीच मोठे खुलासे होताना दिसतात. कॉफी विथ करण शोमध्ये करण जोहर हा बाॅलिवूड (Bollywood) स्टारला त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. करण जोहर हा कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. लोक करण जोहर याला खडेबोल सुनावताना दिसतात.

करण जोहर याने त्याच्या अनेक चित्रपटातून स्टार किड्स लाॅन्च केले. यामुळेच करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि करण जोहर यांच्यामध्ये मोठा वाद बघायला मिळतो. कॉफी विथ करण सीजन 8 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. चाहते या सीजनबद्दल उत्साही आहेत.

नुकताच कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे सहभागी झाले. यावेळी करण जोहर याच्यासोबत धमाल करताना दीपिका आणि रणवीर सिंह हे दिसले. इतकेच नाही तर यावेळी काही मोठे खुलासे देखील करण्यात आले. दीपिका पादुकोण हिला 2015 मध्ये पहिल्यांदा प्रपोज हा रणवीर सिंह याने केला.

नुकताच आता दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नातील एक खास व्हिडीओ पुढे आला. हा व्हिडीओ पाहताना करण जोहर हा भावूक झाल्याचे बघायला मिळाले. करण जोहर याने यावेळी मोठी खंत देखील व्यक्त केली. यावेळी करण जोहर म्हणाला की, मी रिलेशनशिपमध्ये नाहीये, मी सिंगल आहे.

यामुळे मला वाटते, मी कोणासोबत तरी असणे मिस करतोय. जर तुमच्याजवळ तुमचा पार्टनर नसेल तर काही गोष्टी कोणाला शेअर करणार. मी दररोज सकाळी उठलो की, विचार करतो की एक भाग माझ्या आयुष्यामध्ये नाहीये. मला हे माहिती आहे की, माझ्याकडे माझी मुले आणि आई आहे. परंतू तुम्हाला बघतो त्यावेळी मला वाटते की, ज्या व्यक्तीसोबत सकाळी तुम्ही उठता आणि हातामध्ये हात देता ते एक वेगळेच कलेक्शन आहे.