Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Johar | मी सलमान खान असतो तर.. ‘त्या’ खास व्यक्तीला केला असता मेसेज, करण जोहरने कुणाचं नाव घेतलं ?

करण जोहरने बऱ्याच काळानंतर दिग्दर्शनाकडे पुनरागमन केले आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा त्याचा चित्रपट चांगला कलेक्शन करत आहे.

Karan Johar | मी सलमान खान असतो तर.. 'त्या' खास व्यक्तीला केला असता मेसेज, करण जोहरने कुणाचं नाव घेतलं ?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 3:02 PM

Karan Johar : चित्रपट निर्माता करण जोहर सध्या (Karan Johar) त्याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) च्या यशाचा आनंद घेत आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या दोघांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाद्वारे करणने 7 वर्षांनी दिग्दर्शनाकडे पुनरागमन केले असून त्याचा हा चित्रपट हिट ठरला आहे.

दरम्यान मी सलमान खान (Salman Khan) असतो तर एका खास व्यक्तीला मेसेज केला असता, असे करणने नुकतेच सांगितले. एका मुलाखतीत त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तू सलमान खान असतास तर काय केलं असतंस, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.

करणने घेतले कोणाचे नाव ?

हे सुद्धा वाचा

या प्रश्नाचे उत्तर देताना करण म्हणाला की मी शाहरूखला मेसेज करेन. त्याला सांगेन इथे फक्त आपणच आहोत. त्यानंतर त्याला विचारण्यात आले की आलियाचा फोन मिळाला तर तो कोणाला मेसेज करेल ? त्यावर करण म्हणाला की मी अनन्या पांडेला मेसेज करून तिच्या लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारेन.

करण – सलमान एकत्र काम करणार असल्याची सुरू होती चर्चा

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, सलमान खान आणि करण जोहर एका चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. याला सलमान खानने एका शोमध्ये दुजोरा दिला होता. सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये तो म्हणाला की, अलीकडेच करणने मला फोन करून चित्रपटाची ऑफर दिली होती. अनेक वर्षांनी आदित्य चोप्राने आपल्याला चित्रपटांसाठी बोलावणे सुरू केले आहे, असा खुलासाही सलमानने केला आहे. करण जोहर आणि सलमान खान यांनी ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाद्वारे करणने दिग्दर्शनात पदार्पण केले होते.

हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.