बिपाशासोबत बेबोचा 36चा आकडा, छोट्याशा गोष्टीवरून डायरेक्ट कानाखालीच लगावली
बॉलिवूडमधील कॅट फाईटचा विषय निघताच करीना कपूर आणि बिपाशाच्या नावाचा उल्लेख हटकून येतोच. फिल्मच्या सेटवर एका छोट्याशा गोष्टीमुळे बेबो इतकी रागावली की तिचं बिपाशाशी भांडणच झालं. एवढंच नव्हे तिने तिला थेट कानाखालीच लगावली. काय होतं त्यांच्या भांडणाचं कारण ?
फिल्मी दुनियेत अनेक स्टार्स एकमेकांचे मित्र आहेत, पण काही स्टार्स असे आहेत जे एकमेकांचं तोंडही पहात नाहीत. या दुनियेत एकमेकांचं कौतुक करणं किंवा टीका करणं हे सामान्य आहे. पण अशी केलेली एखादी टीका जेव्हा कॅट फाईटमध्ये बदलून जेव्हा सर्वांसमोर येते तेव्हा मग सगळ्यांचीच नजर त्या भांडणावर असते. बॉलिवूडमधील अभिनेत्रींमध्ये अनेकदा अशी कॅट फाईट पाहायला मिळाली आहे. कधी भूमिकेसाठी तर कधी नायकासाठी त्या भांडताना दिसल्या. पण आज आम्ही आपण अशाच एका कॅट फाईटबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे ज्यामध्ये एका अभिनेत्रीने तिच्या सह-अभिनेत्रीला सेटवर सगळ्यांसमोरच कानाखाली मारली होती. कोण होती ती अभिनेत्री ?
2001 मध्ये अक्षय कुमार, बिपाशा बसू आणि करीना कपूर यांचा ‘अजनबी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉबी देओलही मुख्य भूमिकेत होता. अजनबीमध्ये बिपाशा बसू आणि अक्षय कुमारचे काही इंटिमेट सीन्स होते, ज्याची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. सगळ्यांच्या तोंडी फक्त बिपाशाचंच नाव होतं. मात्र यामुळे करीना कपूरला खूपच असुरक्षित वाटत होतं अशी चर्चा तेव्हा सुरू होती.
बिपाशा तर काळी मांजर
विक्रम फडणीस मुळे करीना आणि बिपाशामध्ये वाद झाल्याचं बोललं जातं. खरंतर या चित्रपटात विक्रमने करीनाचा सल्ला न घेताच बिपाशासाठी एक ड्रेस डिझाईन केला होता आणि यामुळेच करीना नाराजा झाली होती. याच मुद्यावरून चित्रपटाच्या सेटवरच करीना आणि बिपाशा दोघींमध्ये वाद सुरू झाला. आणि रागाच्या भरात करीनाने बिपाशाच्या कानाखाली मारली एवढंच नव्हे तर तिला काली बिल्ली ( काळी मांजर) म्हणत तिच्यावर खालच्या शब्दांत टीकाही केली.त्यावेळी हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं.
करीनासोबत कधीच काम करणार नाही – बिपाशाने घेतली शपथ
यानंतर 2001 मध्ये बिपाशाने फिल्मफेअरला मुलाखत दिली. ज्यामध्ये ती या विषयावर स्पष्टपण बोलली. करीनाने अगदी छोट्याशा मुद्याचा मोठा इश्यू केला होता. बेबोचं हे वागणं अतिशय बालिशपणाचं आहे, असं म्हणत बिपाशाने तिच्यावर टीका केली आणइ करीनासोबत भविष्यात कधीच काम करणार नाही अशी शपथही तिने घेतली. तर बिपाशाला जी काही प्रसिद्धी मिळाली आहे, ती सेटवर झालेल्या या भांडणामुळेच मिळाली आहे असं म्हणत करीनानेही तिच्यावर निशाणा साधला.