Ambani Wedding : तैमूरच्या नॅनीचं अनंत अंबानीशी खास कनेक्शन; फोटो शेअर करत म्हणाल्या..
अभिनेत्री करीना कपूर खान हिचा मोठा मुलगा तैमूर अली खान याची बरीच क्रेझ आहे. स्टारकिड्सपैकी सर्वाधिक फोटो त्याचेच काढले जातात. तैमूरला सांभाळणाऱ्या , त्याची नॅनी ललिता डिसील्व्हा यादेखील बऱ्याच फोटोंमध्ये दिसतात. त्यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे, सध्या ज्याची बरीच चर्चा चसुरू आहे. त्यांचं अंबानी कुटुंबियांशी खास कनेक्शन आहे.
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले प्री-वेडिंग फंक्शन्स, क्रूझ पार्टी, लग्नाचे समारंभ, हळद, मेहंदी,लग्न, रिसेप्शन या सोहळ्याचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सगळीकडे त्यांचीच चर्चा आहे. या लग्नासाठी अनेक नामवंत व्यक्ती तसेच बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली. त्यानंतर सोशल मीडियावरून अनंत-राधिकासोबतच फोटो पोस्ट करत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. मात्र सध्या सर्व सेलिब्रिटींच्या पोस्टपेक्षा एका अशा व्यक्तीच्या पोस्टची चर्चा होत आहे, ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही.
ती व्यक्ती म्हणजे ललिता डिसील्व्हा. आता ही महिला कोण असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल ? तर माहितीसाठी सांगू इच्छितो की या महिलेला तुम्ही बऱ्याच वेळा अभिनेत्री करीना कपूर आणि तिचा मुलगा तैमूर याच्यासोबत पाहिलं असेल. तैमूर अली खान याची बरीच क्रेझ आहे. त्याचे अनेक फोटो काढले जातात, आणि त्या फोटोंमध्ये बऱ्याच वेळेस त्याला सांभाळणाऱ्या, त्याची नॅनी ललिता याही दिसतात. त्याच ललिता यांनी अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नातील फोटो शेअर करून त्या दोघांना भरभरून आशीर्वाद, शुभेच्छा दिल्या आहेत.
ललिता आणि अंबानी कुटुंबाचा संबंध काय असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. खरंतर बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल पण सध्या करीनाच्या तैमूर आणि जेहसोबत दिसणाऱ्या ललिता या पूर्वी अंबानी कुटुंबासाठी काम करायच्या. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत याच्या त्या नॅनी होत्या. त्याच ललिता यांनी अनंत राधिकाच्या लग्नात त्यांच्यासोबत काढलेले फोटो शेअर करत एक प्रेमळ पोस्टही लिहीली आहे.
इन्स्टावर शेअर केली पोस्ट
ललिता डिसिल्व्हा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी अनंत अंबानींचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. त्याते दोघेही कत्र दिसत आहेत. अनंत आणि ललिता याचा हा फोटो पॅरिसच्या डिस्ने वर्ल्डमधील आहे. त्याचसोबत त्यांनी अनंत-राधिकाच्या लग्नातील त्या दोघांचे, तसेच मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्यासोबतचेही फोटो शेअर केलेत.
View this post on Instagram
लहानपणी कसे होते अनंत अंबानी ?
ललिता यांनी अनंत अंबानींच्या लहानपणीचा फोटो शेअर करत पोस्ट लिहीली. ‘डिस्ने वर्ल्ड पॅरिसमध्ये हा माझा आणि अनंतचा फोटो आहे. येथूनच मी माझी बेबीसिटिंगची नोकरी सुरू केली. अनंत लहानपणी खूप गोड होता. कुटुंबातील लोक असोत की सोशल ग्रुपमधील, सर्वांचे त्याच्याव खूप प्रेम आहे. आज त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. मी या जोडप्याला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देते’ असे ललिता यांनी लिहीले.
View this post on Instagram
अनंत-राधिकाचे अभिनंदन करत काय म्हटलं ?
एवढंच नव्हे तर ललिता डिसिल्व्हा यांनी अनंत आणि राधिकाच्या रिसेप्शनचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामध्ये त्या नवविवाहीत जोडपं तसेच नीता आणि मुकेश अंबानींसोबत दिसत आहेत. ‘अनंत बाबा आणि अंबानी कुटुंबाने मला आयुष्यात जो आनंद आणि प्रेम दिले, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आम्ही एकत्र घालवलेल्या काळातील आनंदी आठवणी मी अजूनही जपून ठेवल्या आहेत. त्यांचं अतूट प्रेम आणि आदराबद्दल मी कृतज्ञ आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांची नम्रता, दयाळूपणा आणि औदार्य मला प्रेरणा देतं ‘ अशी सुंदर पोस्ट ललिता यांनी लिहीली.
अनंत आणि राधिकाला खूप प्रेम, आनंद आणि उत्तम आरोग्य मिळो ही प्रार्थना. अंबानी कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या जीवनाचा एक भाग असल्याचा मला सन्मान वाटतो, असेही ललिता यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.