करिश्मा कपूरचा तो किस्सा ज्यामुळे तिला झाल्या होत्या प्रचंड वेदना
करिश्मा कपूर आज बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे अगदी आजही. पण तिने जो स्ट्रगल केला आहे त्याचे किस्से मात्र आजही बोलले जातात. असाच एक किस्सा आहे , करिश्माला प्रचंड वेदना होत असताना देखील तिने शुटींग पूर्ण केलं होतं.

करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री होती. आजही ती तेवढीच लोकप्रिय आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आणि त्याच्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केलं. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास हा इतका सोपा नव्हता. तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. करिश्माच्या स्ट्रगलचे किस्से अजूनही आवर्जून सांगत तिचे कौतुक केलं जातं.
एका मुलाखतीत, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी देखील तिचा असाच एक किस्सा सांगितला, करिश्माला प्रचंड वेदना होत असताना देखील तिने शूट केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं तेही कोणतीही तक्रार न करता.
करिश्माला झालेली दुखापत
एका मुलाखतीत कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी म्हटलं की, गाण्याच्या शूटिंगदरम्यान करिश्माची आई बबिता कपूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते हा किस्सा सांगताना म्हणाले की “या गाण्यातील ती गुडघ्यांची मुव्हमेंट ज्यात बबिताजींचा मोठा हात होता.” त्यांनी सांगितलं की बबिता कपूरने करिश्माला एक डान्स मूव्ह करण्यासाठी हट्ट केला. ही डान्स मुव्हमेंट सुरुवातीला फक्त गोविंदासाठी होती.
View this post on Instagram
डान्स मुव्हमेंट फक्त गोविंदासाठीच सेट करण्यात आली होती पण…
ते म्हणाले की, “ती डान्स मुव्ह फक्त गोविंदासाठीच सेट करण्यात आली होती. पण बबिताजींनी त्यात हस्तक्षेप केला आणि म्हटलं, ‘ही डान्सस्टेप तो एकटाच का करत आहे?’ तेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं की, ‘करिश्माने शॉर्ट्स घातले आहेत, ही गुडघ्याची मुव्हमेंट आहे.’ तेव्हा बबिता यांनी आग्रह धरला की,’ती ही डान्स करेल. तिला दाखवा कसं करायचं ते आणि तिला ते करायला लावा.’ पण या डान्समुव्हमेंटच्या हालचालीमुळे करिश्माला प्रचंड दुखापत झाली होती आणि सेटवरील सर्वजण अस्वस्थ झाल्याचंही तिने सांगितलं.
शूटिंगदरम्यान करिश्मा अनेक जखमा
गणेश आचार्य यांनी सांगितलं. “मी इतका घाबरलो होतो की मी माझ्या असिस्टंटला ही स्टेप करून दाखवण्यास सांगितलं आणि बिचारी करिश्मा नकार देऊ शकली नाही. तिने त्याच शॉर्ट्सवर त्या डान्सस्टेप केल्या. गाणे संपल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तिच्या गुडघ्यांना किती जखमा झाल्या होत्या. गोविंदाने त्यांच्या पॅंटच्या आत गुडघ्याखाली सेफ्टी पॅड लावले होते पण करिश्माकडे अशी काहीही सेफ्टी नव्हती. त्यामुळे तिच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली होती. त्यातून खूप रक्त वाहत होतं” अशापद्धतीने आचार्य यांनी नक्की करिश्मासोबत काय प्रसंग घडला होता ते सांगितलं.
“म्हणूनच करिश्मा कपूर आज….”
तसेच आचार्य यांनी करिश्माचं कौतुक करत म्हटलं “म्हणूनच करिश्मा कपूर आज या उंचीवर आहे. तिने प्रचंड मेहनत घेतली आहे आणि तिची आई बबिताजींनी तिच्या आणि करीनाच्या कारकिर्दीत मोठी भूमिका बजावली.” गोरिया चुरा ना मेरा जिया हे गाणे अजूनही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानलं जातं. हे गाणं 1995 च्या ‘कुली नंबर 1’ चित्रपटातील आहे. ज्यामध्ये करिश्मा कपूर आणि गोविंदा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.