आईच्या कडेवर बसलेलं गोंडस बाळ आता आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे?
तुमचे हे आवडते कलाकार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आताही एका प्रसिद्ध अभिनेत्याचा एक क्यूट फोटो व्हायरल होत आहे.
मुंबई : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशा सेलिब्रिटींचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. यामध्ये मग सलमान खान असो, शाहरुख खान असो, मनोज वाजपेयी असो, दीपिका पदुकोन असो किंवा प्रियांका चोप्रा असो अशा अनेक कलाकारांनी संपूर्ण जगभरात त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तुमचे हे आवडते कलाकार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आताही एका प्रसिद्ध अभिनेत्याचा एक क्यूट फोटो व्हायरल होत आहे.
असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे चाहते नेहमीच त्यांच्या सेलिब्रेटीला फॉलो करत असतात. त्या सेलिब्रेटीचे फोटो आणि व्हिडीओ लाइक करत असतात. काहीवेळा अनेक सेलिब्रेटींचे जुने फोटो समोर येतात, तेव्हा काही चाहते त्या सेलिब्रेटीला ओळखतात तर काही चाहते ओळखायला बर्याचदा फसतात.
View this post on Instagram
आता आम्ही तुम्हाला एका बॉलिवूड अभिनेत्याचा बालपणीचा फोटो दाखवत आहोत. सोबतच आम्ही तुम्हाला काही हिंट्स देखील देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही त्या अभिनेत्याला ओळखू शकाल.
या फोटोत एक क्यूट लहान बाळ त्याच्या आईच्या कडेवर दिसत आहे. या बाळाच्या केसांच्या दोन वेण्या घातल्या आहेत ज्यामुळे तो खूप गोंडस दिसत आहे. फोटोत ते बाळ जेवढे गोंडस दिसत आहे तेच आजही तेवढेच देखणे दिसत आहे. तसंच आज तो बॉलिवूडचा मोठा सुपरस्टार असून लाखो मुली त्याच्यासाठी वेड्या झाल्या आहेत.
2011 मध्ये या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं. आता त्याने अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज तो अभिनेता इतका प्रसिद्ध आहे की गेल्या वर्षी त्याने चक्क अक्षय कुमारच्या एका चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्याची जागा घेतली होती.
विशेष सांगायचं झालं तर या अभिनेत्याची डान्स स्टाईल चित्रपटातून चांगलीच व्हायरल झाली होती. तसंच हा अभिनेता फिर हेरा फेरीच्या पुढच्या भागात अक्षय कुमारची जागा घेणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यावरून तुम्ही या अभिनेत्याला नक्कीच ओळखलं असेल. होय, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कार्तिक आर्यन आहे. भुल भुलैया 2 या चित्रपटापासून कार्तिक आर्यन चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटात त्यानं अक्षय कुमारची जागा घेतली होती.