बॉलिवूड अभिनेत्याने किसिंग सीनसाठी घेतले 37 रिटेक; अभिनेत्रीने जाणूनबुजून केल्याचा आरोप

चित्रपटातील एका किसिंग सीनसाठी 37 रीटेक्स घेतल्याने हा सिन मोठी डोकेदुखी ठरल्याचे अभिनेत्याने सांगितले होते. तसेच यासाठी अभिनेत्याने अभिनेत्रीला जबाबदार धरत नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्याने किसिंग सीनसाठी घेतले 37 रिटेक; अभिनेत्रीने जाणूनबुजून केल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 5:01 PM

बॉलीवूडमध्ये आजकाल अफेअर्स, घटस्फोट किंवा इतर काही खाजगी आयुष्याबद्दलच्या चर्चा या अगदीच सामान्य झाले आहेत. त्याचसोबत चित्रपटातील सीन्सदेखील रोमॅंटिक सिन्स किंवा किसिंग सिन्स देखील आता सर्व चित्रपटांमध्ये अगदी सामान्य बाब आहे. तसेच त्या सिन्समध्ये रिटेकही होतात. पण शक्यतो असे सिन्स एकाच टेकमध्ये शूट होतील याची काळजी घेतली जाते.

किसिंग सीन डोकेदुखी ठरली

किसिंग सिन्स किंवा रोमॅंटिक सिन्समध्ये अनेकदा कलाकार एकमेकांबरोबर कंफर्टेबल नसतात. त्यामुळे असे सिन्स शूट करताना एकाच टेकमध्ये पूर्ण करण्याच्या प्रयत्न करतात. पण एका अभिनेत्याला याबाबत एक विचित्र अनुभव आला होता. एका चित्रपटातील किसिंग सीनसाठी या अभिनेत्याला तब्बल 37 रिटेक घ्यावे लागले होते. हा सीनचा किस्सा बॉलीवूडमध्ये खूप गाजला होता. एका मुलाखतीत त्याने त्याच्या या अनुभवाबद्दल सांगितले आहे.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन आहे. कार्तिक आर्यनचा ‘कांची: द अनब्रेकेबल’ हा सिनेमा 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या सिनेमामध्ये कार्तिकसोबत अभिनेत्री मिष्टी चक्रवर्तीची मुख्य भूमिका होती. या सिनेमाचं दिग्दर्शन सुभाष घई यांनी केलं होतं. या सिनेमातील एका किसिंग सीनमुळे कार्तिक नाराज झाला होता.

किसिंग सीनसाठी 37 रिटेक घ्यावे लागले

कार्तिकने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ‘हा किसिंग सीन एवढी मोठी डोकेदुखी ठरेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्या दिवशी आम्ही प्रेमी युगुलांसारखे वागत होतो. पण एक सीन चांगला शूट होत नव्हता. यासाठी 37 रिटेक घ्यावे लागले होते. शेवटी सुभाषजी म्हणाले, ठीक आहे, आम्हाला वाटलं झालं बाबा एकदाचं’

“ती जाणूनबुजून सीन नीट करत नव्हती”

दरम्यान कार्तिक आर्यनने या सीनसाठी एवढे रिटेक घ्यावे लागले त्यासाठी मिष्टीला जबाबदार मानलं होतं. “त्यावेळी मिष्टी जाणूनबुजून सीन नीट करत नव्हती, अशी शक्यता असू शकते. सुभाष घई यांना एक पॅशनेट किसिंग सीन हवा होता आणि मला किस कसे करायचे हे माहीत नव्हतं. मी त्यांना विचारणार होतो, ‘सर, मला किस कसे करायचे ते दाखवा’,” असं म्हणत कार्तिकने या रिटेकसाठी मिष्टीला जबाबदार धरत नाराजी व्यक्त केली आहे.

‘कांची: द अनब्रेकेबल’मध्ये मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, आदिल हुसेन, मुकेश भट्ट, चंदन रॉय सान्याल, रिषभ सिन्हा आणि महिमा चौधरी यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात मिष्टीने कांचीचे पात्र केले होते, तर कार्तिक आर्यन बिंदाच्या भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.