KBC Season 15 : पहिल्या आठवड्यातच बिग बींना मिळाला इशारा, अवघ्या 18 वर्षांची स्पर्धक म्हणाली, जर तुम्ही…
KBC Season 15 : कौन बनेगा करोडपतीचा वा, 15 सीझन जोशात सुरू झाला असून त्याच्या पहिल्या आठवड्यातच बिग बींना इशारा मिळाला आहे. रात्री उशीरापर्यंत ऑनलाइन राहणाऱ्या अमिताभ बच्चन यांना शोमध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या मुलीने एक इशारा दिला आहे.
मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे ‘कौन बनेगा करोडपती’च्या (KBC) नव्या सीझनद्वारे प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस आले आहेत. मात्र नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यातच बिग बी यांना एक मोठा इशारा देण्यात आला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या शोमध्ये धिमाही त्रिवेदी नावाच्या एका 18 वर्षांच्या मुलीने अमिताभ यांना हा इशारा दिला. रात्री उशीरापर्यंत जागून सोशल मीडिया फोन वापरू नका, असा सल्ला तिने दिला असून, हेच रूटीन कायम राहीले तर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतील, असेही तिने बिग बी यांना सांगितले.
18 वर्षांच्या स्पर्धकाचा बिग बींना इशारा
हॉट सीटवर बसलेल्या धिमाही हिने अमिताभ बच्चन यांना सांगितले की ती दिवसभरात फक्त अर्धा तास सोशल मीडियाचा वापर करते. बोलता-बोलता ती बिग बींना म्हणाली की, तुम्ही मध्यरात्री देखील ऑनलाइन असता. तुम्ही चित्रपटांसाठी शूटिंग करता आणि आता केबीसीचे पण शूटिंग सुरू आहे. मग तुम्ही सोशल मीडिया कशी मॅनेज करता ? असा सवाल धिमाहीने अमिताभ यांना विचारला. तेव्हा बिग बींनी तिला विचारले, तुम्ही माझं सोशल मीडिया पेज पाहता का , तेव्हा ती म्हणाली की हो, काही वेळा मी पाहिलंय की तुम्ही रात्री 2 वाजताही पोस्ट शेअर करता. त्यावर बिग बींनी विचारले, ‘मी काही चुकीचं करतो का ? ‘
View this post on Instagram
धिमाही म्हणाली, ‘ नाही सर, पण रात्री उशीरापर्यंत मोबाईल पाहिला तर डार्क सर्कल्स येतात. आणि तुम्हाला तर एकदम हँडसम दिसायचे आहे, त्यामुळे तुम्ही लवकर झोपा, आराम करा.’ यावर उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ते त्यांच्या चाहत्यांसाठी थोडा वेळ काढत असतात, तसं नाही केलं तर वाईट वाटतं.
View this post on Instagram
यापूर्वी सोनी टीव्हीवर केबीसीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये धिमाही अमिताभ यांना सांगते की सर, तुमचं जे (आत्ता) वय आहे, ते उलटं केलं तर माझं वय होईल. अमिताभ बच्चन यावर्षी 81 वर्षांचे होतील. केबीसीच्या नव्या सीझनमुळे प्रेक्षक खूप खुश असून ते रोज शोची उत्कंठेने वाट बघत असतात.