14 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF: Chapter 2) या चित्रपटाला अजूनही सिनेमागृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. ईदच्या (Eid) दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली. बॉक्स ऑफिसवर दर आठवड्याला इतर चित्रपटांचं आव्हान असतानाही यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. किंबहुना इतर चित्रपटांना केजीएफ 2 चा फटका बसल्याचं पहायला मिळालं. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ईदच्या दिवशी भारतात 9 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर अजय देवगणच्या ‘रनवे 34’ने 4 कोटी आणि टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ने 2.50 कोटी रुपयांची कमाई केली. केरळमध्येही केजीएफ 2 ची चांगली कमाई होतेय. प्रदर्शनाच्या दुसऱ्या वीकेंडला या ब्लॉकबस्टर चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला जमवला होता.
प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला. नुकतंच या चित्रपटाने जगभरात कमाईचा 1000 कोटींचा आकडा पार केला आहे. ईदच्या दिवशी केजीएफ 2 ने ‘हिरोपंती 2’ आणि ‘रनवे 34’ पेक्षाही अधिक कमाई केली आहे.
Early estimates for All-India Nett for Hindi Movies #Eid
1. #KGFChapter2 – ₹ 9 Crs
2. #Runway34 – ₹ 4 Crs
3. #Heropanti2 – ₹ 2.50 Crs
— Ramesh Bala (@rameshlaus) May 4, 2022
या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडन या बॉलिवूड कलाकारांच्याही भूमिका आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 1’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. केजीएफ 2 हा सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट ठरला आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या ‘2.0’ या चित्रपटाला केजीएफ 2ने मागे टाकलं आहे. येत्या काही दिवसांत तो ‘पीके’ या चित्रपटालाही मागे टाकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.