Khatron Ke Khiladi 13 : तिचं नाव समोर आल्यावर मी गप्प.. ! सलमान खानच्या हिरॉईनचा या अभिनेत्रीवर निशाणा
रोहित शेट्टी याचा'खतरों के खिलाड़ी 13' हा शो सतत चर्चेत असतो. यावेळी शोमध्ये स्टंटसोबत स्पर्धकांची नोक-झोकही पहायला मिळत आहे. शो च्या मेकर्सनी नुकताच एक नवा प्रोमो शेअर केला आहे.
Khatron Ke Khiladi 13 : ‘खतरों के खिलाड़ी 13’ (khatron ke khiladi 13) हा शो सुरू झाला असून मेकर्स रोज नवनवे प्रोमो शेअर करत असतात. रोहित शेट्टीच्या (rohit shetty) या शोमधून निर्माण झालेली दुश्मनी शो च्या बाहेर देखील पहायला मिळत आहे. अर्चना गौतम (Archana Gautam) आणि डेझी शाह (Daisy Shah) या दोघीही सतत एकमेकींवर कमेंट्स करताना दिसतात. गेल्या काही दिवसांमध्ये त्या एकमेकींविरोधात बरंच काही बोलल्या होत्या. आता त्याचदरम्यान ‘खतरों के खिलाड़ी 13’ च्या मेकर्सनी एक नवा प्रोमो शेयर केला आहे.
हा प्रोमो पाहूनच एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की हा शो सुरू असल्यापासूनच अर्चना आणि डेझी शाह यांच्यात काही आलबेल नव्हते, त्यांचं एकमेकींशी पटत नव्हतं. त्यातील सर्व राग त्या दोघी शो मधून बाहेर आल्यानंतरही एकमेंकीवर काढत आहेत. या प्रोमोबद्दल सांगायचे झाले तर शोचा होस्ट रोहित शेट्टी डेझी शाह हिला अर्चना बद्दल प्रश्न विचारतो. मात्र प्रश्न ऐकताच डेझीने जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या. ‘अर्चना गौतम हिचं नाव समोर आलं की मी चूप राहणंच पसंत करते,’ असं डेझी म्हणाली.
डेझीचे हे बोलणं ऐकून अर्चना आश्चर्यचकित झाली. त्यानंतर, तिचा मुद्दा पूर्ण करताना, डेझी म्हणाली की ती खूप जास्त बोलते. त्यावर अर्चना म्हणाली की मी गप्प राहिले तर कसं चालेले. तेव्हा डेझी म्हणाली कि स्पर्धक स्टंट करतात, तेव्हा (तिच्या) बऱ्याच कमेंट्स येतात. यावर अर्चनाने आपण अस काहीच करत नसल्याचं स्पष्ट केले. आता ‘खतरों के खिलाडी 13’ मध्येही एक ‘मंडली’ (ग्रुप) तयार झाले आहे, ज्यामुळे तिला प्रॉब्लेम आहे, असे अर्चनाने सांगितले.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत डेझीला अर्चनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली की, तिला अर्चना बिलकूल मनोरंजक वाटत नाही. अर्चना गौतम हिला बिग बॉस 16 द्वारे खूप लोकप्रियता मिळाली होती आणि शोमध्येही ती बऱ्याच जणांना आवडली होती.