Khuda or Mohabbat मधील अभिनेत्रीने घातलेला ड्रेस पाहून चाहत्यांचा चढला पारा, व्हिडीओ व्हायरल!

पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अझीझ पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. बॅकलेस ड्रेस परिधान केल्याबद्दल सोशल मीडियावर चाहते कमेंट करत आहेत.

Khuda or Mohabbat मधील अभिनेत्रीने घातलेला ड्रेस पाहून चाहत्यांचा चढला पारा, व्हिडीओ व्हायरल!
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 9:25 PM

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अजीज नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. इकरा अजीजचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली असून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अभिनेत्री इकरा अजीज ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.  बुधवारी इकराने तिचा एक व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पण इकाराने घातलेला हा ड्रेस वन-साइड ऑफ-शोल्डर असल्यामुळे अनेक पाकिस्तानी नेटकरी संतापले आहेत.

इकरानं शेअर केलेल्या व्हिडीओत ती गुलाबी ड्रेसमध्ये कपड्यांचा ब्रँडचं प्रमोशन करताना दिसत आहे.  या व्हिडीओमध्ये इकरा खेळताना, उड्या मारताना आणि वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तसंच इकरानं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, बुधवारी आम्ही गुलाबी रंगाचे कपडे परिधान करतो, म्हणजे मुली.  हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नेटकरी काय म्हणत आहेत?

इकरा अजीजनं घातलेला हा बॅकलेस ड्रेस पाहिल्यानंतर अनेकांना राग व्यक्त करत त्यांनी तिला  संस्कृतीची आठवण करून दिली आहे.  ट्विंकल नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्तीनं लिहिले, “तुम्ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये राहताय. ” तर एकीनं सांगितलं की, आम्ही पण गुलाबी रंगाचे कपडे घालतो पण सोबत शलवारही घालतो.  तू घालायला विसरलीस.

पुढे इर्शाद इक्बालने लिहिलं, “हा ड्रेस घालताना तुला लाज वाटायला पाहिजै इकरा.”  तर दुसऱ्यानं लिहिले, “सुंदर पारंपारिक कपडे सोडून हे असं परिधान केल्यास पाकिस्तानची परंपरा नष्ट होईल.”

खुदा और मोहब्बत सीझन 3 मधून मिळाली प्रसिद्धी

इकरा अझीझने आतापर्यंत अनेक हिट पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केले आहे.  सुनो चंदा, रांझा रांझा करडी, कुर्बान आणि रकीब यांसारख्या शोमध्ये तिनं काम केले आहे.  तसंच 2021 मध्ये आलेल्या खुदा और मोहब्बतच्या सीझन 3 मध्ये इकरा मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती.  यात ती पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानसोबत दिसली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.