आई गेल्यानंतर ती कधीच… श्रीदेवी यांच्या निधनानंतर कशी होती खुशीची स्थिती, जान्हवीने सांगितला ‘तो’ अनुभव
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर कॉफी विथ करण 8 मध्ये नुकत्याच सहभागी झाल्या. दोघांनी करण जोहरसोबत शोमध्ये खूप धमाल केली. दरम्यान, कपूर बहिणी त्यांची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दलही बोलल्या. त्यांनी अेक आठवणींना उजाळा दिला.
मुंबई | 4 जानेवारी 2024 : करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करण चा 8 सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिची धाकटी बहीण खुशी कपूरसोबत या शोमध्ये दिसली होती. यावेळी त्या दोघींनी अनेक मजेशीर आणि रंजक किस्से शेअर केले. यावेळी त्या दोघी त्यांची आई आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जाण्याबद्दलही बोलल्या. श्रीदेवी यांच्यासंदर्भात अनेक आठवणीही त्यांनी शेअर केल्या. त्याचवेळी जान्हवी हिने खुशी संदर्भातही एक किस्सा सांगितला.
श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यावर खुशी हिची रिॲक्शन कशी होती, तो कठीण काळ कसा होता, याबद्दल जान्हवीने खुलास केला. त्या कठीणा काळात खुशी हिने संपूर्ण घर सांभाळलं, सर्वांना आधार दिला. जान्हवीने सांगितलं, तिला जेव्हा कॉल आला, तेव्हा ती तिच्या रूममध्ये होती. तिला खुशीच्या रूममधून रडण्याच्या आवाज आला. पण ही बातमी ऐकल्यावर जान्हवी रडतरडत खुशीच्या रूममध्ये गेली, तेव्हा समोर तिने जे दृश्य पाहिल, ते ती कधीच विसरू शकणार नाही.
खुशीने आम्हाला सर्वांनाच सांभाळलं
जान्हवी रूममध्ये आल्याचे दिसताच खुशीने तिचं रडणं थांबवलं आणि ती जान्हवीच्या शेजारी बसून तिला धीर देत होती. ‘त्या दिवसापासून मी माझ्या धाकट्या बहिणीला आईसाठी रडताना कधीच पाहिलं नाही’, अस जान्हवी म्हणाली. आई गेल्यानंतर आमच्या आयुष्यात बरेच बदल झाले. जेव्हा गरज असते, तेव्हा आम्ही एकमेकांचे मित्र बनतो आणि वेळप्रसंगी एकमेकींची आईही बनतो, असं इमोशनल झालेल्या जान्हवीने सांगितलं.
श्रीदेवी यांच्या मृत्यूने बसला धक्का
25 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता. श्रीदेवी यांचे वयाच्या 54 व्या वर्षी झालेलं निधन हा त्यांच्या कुटुंबयांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी, त्यांच्या चाहत्यांसाठीही मोठा धक्का होता. विशेष म्हणजे त्याच वर्षी जुलै महिन्यात जान्हवी कपूरने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. ‘धडक’ हा तिचा पहिला चित्रपट त्याच वर्षी प्रदर्शित झाला होता पण रिलीजपूर्वीच श्रीदेवीचे निधन झाले. तर 2023 च्या डिसेंबरमध्ये खुशी कपूरनेही ‘द आर्चीज’ चित्रपटातून पदार्पण केले. तिच्यासोबत शाहरुखची लेक सुहाना आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य यांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.