KKBKKJ | प्रेक्षकांना कसा वाटला सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’? ‘इंटरवल’नंतर जे घडलं..

| Updated on: Jan 07, 2025 | 3:37 PM

'किसी का भाई किसी की जान' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

KKBKKJ | प्रेक्षकांना कसा वाटला सलमानचा किसी का भाई किसी की जान? इंटरवलनंतर जे घडलं..
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. ईदच्या एक दिवस आधी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. बॉलिवूडसोबत साऊथचा तडका असलेल्या या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलीच गाजली. ट्विटरवर शुक्रवार सकाळपासूनच चित्रपटाचे बरेच स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत. हा चित्रपट पाहिलेल्यांनी ट्विटरवर रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली आहे. सलमानच्या या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पहायला मिळते.

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटावर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना मध्यांतरापूर्वीचा भाग खूप आवडला तर इंटरवलनंतर चित्रपट कंटाळवाणा असल्याचं काहींनी म्हटलंय. ‘मध्यांतरापूर्वीचा चित्रपट खूपच मनोरंजक आहे. त्यात मैंने प्यार कियाचा ट्विस्टसुद्धा आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हा कॉपी पेस्ट रिमेक’ असल्याचं दुसऱ्याने म्हटलंय. या चित्रपटातून बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचं अभिनय ठीकठाक असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत.

सलमानचा हा चित्रपट दोन कारणांसाठी खास मानला जातोय. पहिलं म्हणजे जवळपास तीन वर्षांनंतर सलमानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार वर्षांनंतर ईदच्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खुद्द सलमानने या चित्रपटासाठी मोठी फी आकारली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.

या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडेने सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने जवळपास 5 कोटी रुपये आकारल्याचं कळतंय. शहनाज गिलसोबत या चित्रपटातून अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसुद्धा बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकतेय.