Ratris Khel Chale 3 | मालवणी मालिकेत ऐकू येतोय चक्क मल्याळी सूर, अभिरामच्या बायकोच्या भूमिकेत दिसणारी ‘ही’ अभिनेत्री कोण?

पहिल्या दोन्ही पर्वात अभिरामची बायको अर्थात ‘देविका’ ही व्यक्तिरेखा सर्वांना परिचित झाली होती. मात्र, या पर्वात देविकाऐवजी ‘कावेरी’ अभिरामची पत्नी दाखवण्यात आली आहे. ‘कावेरी’च्या निमित्ताने एक प्रसिद्ध चेहरा मालिका विश्वात पदार्पण करताना दिसत आहे.

Ratris Khel Chale 3 | मालवणी मालिकेत ऐकू येतोय चक्क मल्याळी सूर, अभिरामच्या बायकोच्या भूमिकेत दिसणारी ‘ही’ अभिनेत्री कोण?
भाग्या नायर
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:55 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘अण्णा नाईक परत येणार?’ याची चर्चा सर्वत्र सुरु होती. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले 3’चे (Ratris Khel Chale 3) प्रोमोज देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि आता या कथेत पुढे काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता मालिका सुरू झाल्यावर या मालिकेतील विविध व्यक्तिरेखांविषयी चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच या पर्वातही सगळे दिसतील, अशी प्रेक्षकांना आशा होती (Know about zee Marathi Ratris Khel Chale 3 kaveri fame actress bhagya nair).

मात्र, पहिल्या दोन भागांतील काही व्यक्तिरेखा आपल्याला पुन्हा या भागातही आलेल्या दिसतायत. तर, काही नवीन व्यक्तिरेखाही दाखल होताना दिसतात. यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे अभिरामची बायको. पहिल्या दोन्ही पर्वात अभिरामची बायको अर्थात ‘देविका’ ही व्यक्तिरेखा सर्वांना परिचित झाली होती. मात्र, या पर्वात देविकाऐवजी ‘कावेरी’ अभिरामची पत्नी दाखवण्यात आली आहे. ‘कावेरी’च्या निमित्ताने एक प्रसिद्ध चेहरा मालिका विश्वात पदार्पण करताना दिसत आहे. मालिकेत अभिरामची पत्नी अर्थात ‘कावेरी’ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री भाग्या नायर साकारत आहे. भाग्या  नायर हिला आपण सगळेच ‘itsuch’ या युट्युब चॅनेल वरील वेब सीरीजमधील भूमिकांतून नेहमी पाहिले आहे. मालवणी भाषेतील या मालिकेत भाग्याने तिच्या खास मल्याळम शैलीत संवाद म्हणत एक वेगळाच ट्वीस्ट दिला आहे.

कोण आहे भाग्या नायर?

View this post on Instagram

A post shared by Bhagya Nair (@bhagya.nair)

‘itsuch’ हे युट्युब चॅनेल त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनामधील वेब सीरीज आणि शॉर्ट व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्री भाग्या ही या कालाकारांच्या चमूमधील मुख्य कलाकार आहे. लहानपणापासूनच भाग्याला अभिनयाची आवड होती. तिने महाविद्यालयीन काळात अनेक एकांकिका स्पर्धांतून सहभागी होत, आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. तिचा सहभाग असलेल्या अनेक एकांकिकांनी स्पर्धांमध्ये पारितोषिकंही पटकावली आहेत (Know about zee Marathi Ratris Khel Chale 3 kaveri fame actress bhagya nair).

‘सुंदरी’, ‘दादाची रक्षण सेना’, ‘उत्खनन’ या तिची भूमिका असलेल्या काही पारितोषिक विजेत्या नाट्यकृती. यापैकी ‘सुंदरी’ या नाटकातील तिच्या भूमिकेसाठी तिला अभिनयाचं पारितोषिकही मिळालं आहे. रंगभूमीवर वावरत असताना तिने नवमाध्यम असणाऱ्या वेब सीरीज आणि शॉर्ट फिल्म्स मध्येही काम करण्यास सुरुवात केली होती. तिने ‘क्षणिक’ नावाच्या हिंदी शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. त्यात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती. तसेच itsuch च्या अनेक  शॉर्ट फिल्म आणि व्हिडीओमध्येही तिने काम केले आहे.

उत्तम नृत्यांगनाही!

अभिनयासोबतच भाग्या ही उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतलेले आहे. तसेच, तिने अनेक ब्रँड्ससाठी मॉडेलिंग देखील केले आहे. महाविद्यालयीन जीवनात कलाक्षेत्रासोबतच भाग्या खेळातही अग्रेसर होती. आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी भाग्या ही ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत दाखल होणं म्हणजे प्रेक्षकांसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्काच आहे. या मालिकेत भाग्या साकारात असलेली ‘कावेरी’ जर ‘अभिराम’ची पत्नी आहे, तर ‘देविका’ कुठे गेली असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्याच बरोबर मालिकेच्या नव्या प्रोमोत भाग्या चक्क शेवंताच्या रुपात दिसल्याने प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

(Know about zee Marathi Ratris Khel Chale 3 kaveri fame actress bhagya nair)

हेही वाचा :

Holi 2021 | मराठी कलाकारांवरही चढलाय होळीचा रंग, ‘या’ जोड्या साजरी करणार लग्नानंतरची पहिली होळी!

पायाला गंभीर दुखापत, उभं राहण्याची शाश्वती नाही, तरीही ‘या’ अभिनेत्याने पूर्ण केला नाटकाचा शो!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.