Adipurush Box Office Collection | पहिल्याच दिवशी ‘आदिपुरुष’ने शाहरुखच्या चित्रपटाचा रेकाॅर्ड मोडला, तब्बल इतक्या कोटींची कमाई

| Updated on: Jun 17, 2023 | 3:06 PM

आदिपुरुष चित्रपट नुकताच मोठ्या वादानंतर शेवटी रिलीज झालाय. विशेष म्हणजे आदिपुरुष झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात चित्रपटावर टीका करण्यात आली. शेवटी आता चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन पुढे आले असून धमाकेदार सुरूवात चित्रपटाने केलीये.

Adipurush Box Office Collection | पहिल्याच दिवशी आदिपुरुषने शाहरुखच्या चित्रपटाचा रेकाॅर्ड मोडला, तब्बल इतक्या कोटींची कमाई
Adipurush
Follow us on

मुंबई : ओम राऊत यांचा आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठा धमाका हा केला. आदिपुरुष हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यास देखील सुरूवात करण्यात आली. आदिपुरुष चित्रपटाचे टीझर (Teaser) रिलीज होताच मोठ्या वादाला तोंड फुटले. टीझर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटामध्ये अनेक बदल हे देखील करण्यात आले. आदिपुरुषमध्ये प्रभास हा मुख्य भूमिकेत असून बाॅलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही अनेकांनी या चित्रपटावर टीका करण्यास सुरूवात केली.

पठाण चित्रपटाचे रेकाॅर्ड आदिपुरुष चित्रपट तोडले असे सांगितले जात होते. अनेक रिपोर्टमध्ये आदिपुरुष चित्रपट धमाकेदार सुरूवात करेल असा अंदाजा वर्तवला होता. शेवटी आता आदिपुरुष चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे पुढे आले आहे. विशेष म्हणजे खरोखरच आदिपुरुष चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग ही नक्कीच केलीये.

आदिपुरुष चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात आलाय. विशेष म्हणजे फक्त भारतामध्येच नव्हे तर विदेशात देखील आदिपुरुष चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळतोय. रिपोर्टनुसार जगभरातून आदिपुरुष चित्रपटाने 90 ते 120 कोटींची कमाई केलीये. विदेशातील अजून पूर्ण आकडे हे पुढे आले नाहीयेत. भारतामध्येही आदिपुरुषचा जलवा हा बघायला मिळतोय.

कमाईमध्ये पठाण चित्रपटाला देखील मागे टाकताना आदिपुरुष चित्रपट दिसत आहे. आदिपुरुष चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे विंकेडचा फायदा हा आदिपुरुष चित्रपटाला होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकत नाहीत, यामुळे आता हा चित्रपट काय धमाल करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पुढील काही दिवस चित्रपट जलवा बाॅक्स आॅफिस करेल असे सांगितले जात आहे.

आदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर सैफ अली खान हा होता. अनेकांना आदिपुरुष चित्रपटातील सैफ अली खान याचा लूक अजिबातच आवडला नसल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर एकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, आदिपुरुषमध्ये रावण बघितला की, घाबरणे सोडा मी तर पोट धरून हसलो. सोशल मीडियावर चित्रपटाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नकारात्मक कमेंट या बघायला मिळत आहेत.