बॉलिवूडचा बेताज बादशाह असलेल्या शाहरुख खान याला वेगळ्या प्रसिद्धीची किंवा ओळखीची गरज नाही. दिल्लीत जन्मलेल्या या स्टारचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. प्रत्येक सिनेमाप्रेमी हा शाहरूखशी संबंधित कोणतीही बातमी मन लावून वाचत असतो, ऐकत असतो. किंग खानचे चाहते हे त्याची प्रत्येक अपडेट ठेवतात, त्याच्याबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल सगळी माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. शाहरूखच्या पर्सनल लाइफबद्दल जाणून घेण्यातही लोकांन रस असतो. त्याच्या कुटुंबात नेमकं कोण कोण आहेत ते जाणून घेऊया.
शाहरूखच्या फॅमिली ट्री बद्दल बोलायचं झालं तर सुरूवात त्याच्या वडिलांपासून, मीर ताज मोहम्मद यांच्यापासून होते. शाहरूखने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याचे वडील हे भारतातील सर्वात कमी वयाचे स्वातंत्र्य सैनिक होते. तर त्याच्या आईचं नाव लतीफ फातिमा होतं. अगदी कमी वयातच शाहरुखने त्याच्या वडिलांना गमावल आणि फिल्मी करिअरला सुरूवात होत असतानाच, सेटल होण्यापूर्वीच त्याच्या आईचाही मृत्यू झाला. शाहरूचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पसरले आहे. तो कितीही मोठा स्टार असला तरी त्याचं कुटुंब त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. शाहरुख खान याला एक बहीणही आहे, मात्र तिच्याबद्दल लोकांना फारसं माहीत नाही. शाहरुखच्या बहिणीचं नाव शेहनाज लालारुख खान आहे. मात्र ती फारशी लाईमलाइटमध्ये नसते.
रोमान्सच्या बादशहाची अनोखी प्रेमकहाणी
शाहरुखने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए केले आणि त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली येथून मास कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखने मास कम्युनिकेशनचा अभ्यास अर्धवट सोडला होता. किंग खानला रोमान्सचा बादशाह असेही म्हटले जाते. पडद्यावर तो जितका रोमँटिक दिसतो तितकाच तो खऱ्या आयुष्यातही तितकाच रोमँटिक माणूस आहे. गौरी खान आणि त्याची लव्हस्टोरी तर सर्वांनाच माहीत आहे. गौरीच्या शोधात शाहरुख खान दिल्लीहून मुंबईत पोहोचला होता. गौरी खान हिने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून बीए ऑनर्सची पदवी मिळवली आहे. यानंतर तिने NIFT मधून फॅशन डिझायनिंगचा 6 महिन्यांचा कोर्सही केला. ती एक नामवंत इंटिरिअर डिझायनर आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ विवाहीत असलेले शाहरुख गौरी आज तीन सुंदर मुलांचे पालक आहेत. आर्यन, सुहाना आणि अबराम या तिघांसोबतच शाहरुख खान आणि गौरी खान आनंदी आयुष्य जगत आहेत.
किती शिकलाय आर्यन खान ?
शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन याने कॅलिफोर्नियातील यूनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्निया मधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स आणि टेलिव्हिज प्रॉडक्शचा अभ्यास केला आहे. सध्या तो चित्रपटांच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. याशिवाय आर्यनने स्वतःची क्लोदिंग लाइनही सुरू केली आहे.
मुलीने ठेवले वडिलांच्या पावलावर पाऊल
तर शाहरूखची लेक सुहाना हिने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय ब्यूटी ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर बनलेल्या सुहाना खानने लंडन आणि न्यूयॉर्कमधून शिक्षण घेतले आहे. सुहाना खानने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर ती लंडनला गेली आणि तिथल्या एर्डिंगली कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्याने न्यूयॉर्कच्या NYU-Tisch स्कूल ऑफ आर्ट्समधून अभिनय आणि नाटकाचे शिक्षण घेतले. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून गेल्या वर्षी तिने डेब्यु केलं , हा चित्रपट फारसा चालला नसला तरी सुहानाची अनेकांनी दखल घेतली. सध्या ती आगामी प्रोजेक्ट्समध्ये बिझी असून अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही झळकते आहे. तर शाहरुखचा धाकटा लेक अबराम नुकताच ११ वर्षांचा झाला असून त्याच्या क्युटनेसमुळे सर्वाचं लक्ष वेधून घेतो.