मुंबई: महाराष्ट्रातील प्रसिद्ध गीतकार, कवी हरेंद्र जाधव यांचं काल निधन झालं. नवी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. एकेकाळी हरेंद्र जाधव यांच्या गीतांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. पिढ्या बदलल्या तरी त्यांच्या गीतांचा गोडवा काही कमी झाला नाही. जाधव यांनी असंख्य लोकप्रिय गीतं लिहिली. पण त्यांच्या काही हिट गाण्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. कोणती होती ही गाणी? वाचाच. (know Unforgettable songs of harendra jadhav)
या गाण्याशिवाय जयंतीच होत नाही
लयास गेली युगा युगांची, हीन दीन अवकळा,
पहा, पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा…
या हरेंद्र जाधव यांच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी अत्यंत तन्मयतेने गायलं. या गाण्याने लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. आंबेडकर जयंतीला हे गाणं वाजलं नाही असं होत नाही. या गाण्याशिवाय आंबेडकर जयंती साजरीच होत नाही. इतकं हे गाणं लोकप्रइय आहे.
गणेशोत्सवात हमखास वाजणारं गाणं
तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता,
अवघ्या दीनांच्या नाथा,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे,
चरणी ठेवितो माथा…
या गाण्याचा गोडवाही तसाच. जाधवांच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं गणेशोत्सावत हमखास वाजतंच वाजतं. या गाण्याशिवायही गणशोत्सव साजरा होत नाही. किंवा गणेशोत्सव साजरा झाल्याचा फिल येत नाही. इतकं हे गाणं अवीट गोडीचं आहे.
जाधवांची गाजलेली लोकगीतं
माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू,
बाई देव पावला गं…
आणि
देवा मला का दिली बायको अशी,
शिकवून थकलो मी दर दिवशी, दर दिवशी,
देवा मला का दिली बायको अशी…
आणि
हा संसार माझा छान,
राव दिला मला देवानं…
आणि
आता तरी देवा मला पावशील का?
सुख ज्याला म्हणतात, ते दावशील का?…
हजारो गाणी लिहिली
हरेंद्र जाधव यांनी पहा पहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा… तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा… माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू… हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं… आता तरी देवा मला पावशील का?, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? आदी गाणी लिहीली आहेत. त्यांनी आतापर्यंत दहा हजाराच्यावर गाणी लिहिली आहेत. अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवालपासून ते बेला सुलाखे, साधना सरगमपर्यंत अनेक गायक, गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत. (साभार, आंबेडकरी कलावंत) (know Unforgettable songs of harendra jadhav)
संबंधित बातम्या:
गाण्यासाठी उर्दू, अरबीही शिकल्या; निशा भगत यांची गाजलेली गाणी माहीत आहे का?
गाणं ऐकून रेल्वेचा अधिकारी म्हणाला, ‘बेटा, रेल मे नोकरी करोगी?’; वाचा, गायिका निशा भगत यांचा किस्सा
दिवसा शाळा, रात्री गायनपार्ट्या, लतादीदींनीही कौतुक केलेली ही गायिका माहीत आहे का?
(know Unforgettable songs of harendra jadhav)