Sara Ali Khan | सावत्र आई करीनाशी कसं आहे सारा अली खानचं नातं ?
सारा अली खान आणि तिची सावत्र आई, अभिनेत्री करीना कपूर खान यांच्यातलं नातं कसं आहे, दोघी एकमेकींशी कशा वागतात बोलतात, हे जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. मी करीनाला आई मानत नाही, असं सारानेच बऱ्याच वेळा उघडपणे सांगितले आहे.
Sara-Kareena Relation : बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याची दुसरी पत्नी करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि सैफची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्यात 13 वर्षांचं अतंर आहे. सैफ-करीनाच्या लग्नात साराने खूप एन्जॉय केलं होतं. पण असं असलं तरी बऱ्याच वेळेस सारा आणि करीना यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. साराही बऱ्याच वेळेस म्हणाली आहे की तिच्याकडे आधीच एक प्रेमळ आई आहे, ती करीनाला आई मानत नाही. अशा वेळी सारा आणि करीनाचं नातं नक्की कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. साराचा आज वाढदिवस असून, तिच्या या नात्याबद्दल ती काय सांगते, ते जाणून घेऊया.
सारा अली खान आणि करीनाचं नातं
सारा अली खान आणि करीना कपूर खान यांच्या दरम्यान मैत्रीपूर्ण नातं आहे. एवढचं नव्हे तर सारा ही करीनाला आई म्हणून हाक मारत नाही. एका मुलाखतीदरम्यान सारानेच हा खुलासा केला होता. माझ्याकडे आधीच एक प्रेमळ आई आहे, आणि बाबांना (सैफ अली खान) देखील असं वाटत नाही की मी करीनाला आई मानून, तशी हाक मारावी. त्यामुळे सारा करीनाला थेट तिच्या नावाने किंवा K अशी हाक मारते.
इब्राहिम अली खानशी कसं आहे करीनाचं नातं ?
साराच नव्हे तर तिचा छोटा भाऊ, सैफ-अमृता यांचा छोटा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबतही करीनाचं नातं चांगल आहे. रॉकी और रानी च्या सेटवर इब्राहिमला बराच वेळ (करीनाशी) फोनवर बोलताना पाहिलं होतं, असं करण जोहरने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं. यावरूनच सारा आणि इब्राहिमचं करीनाशी नातं कसं असेल याची तुम्हाला कल्पना आली असेलच.
View this post on Instagram
करीनाशी आहे उत्तम बाँडिंग
सारा अली खान ही बऱ्याच वेळेस सैफच्या घरी जात असते. तैमूरचा वाढदिवस असो किंवा जेहची पार्टी, सारा बऱ्याच कार्यक्रमात सहभागी होते. सारा आणि इब्राहिम दोघेही बऱ्याच वेळेस वडिल, सैफ अली खान याच्यासोबत वेळ घालवताना दिसतात. करीनादेखील त्यांचे शानदार बाँडिग मजबूत बनवण्यासाठी आणि त्यांच्या पर्सनल स्पेसची पूर्ण काळजी घेते.
सैफच्या घरात का रहात नाहीत सारा आणि इब्राहिम ?
सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांना सारा व इब्राहिम अशी दोन मुलं आहेत. 2004 साली सैफ व अमृता यांचा घटस्फोट झाला व त्यानंतर सारा आणि इब्राहिम त्यांच्या आईसोबत राहू लागले. तर 2012 साली सैफ आणि करीना या दोघांनी लग्न केलं. असं असलं तरी सारा आणि इब्राहिम बऱ्याच वेळेस वडिलांसोबत वेळ घालवताना दिसतात.