तर ही टीव्ही अभिनेत्री बनली असती आमिर खानची हिरॉईन, ‘ठग्स ऑफ हिन्दुस्तान’ ची मिळाली होती ऑफर

एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतून काम सुरू करणाऱ्या या अभिनेत्रीने हळूहळू चित्रपटसृष्टीतही चांगला जम बसवला आहे.

तर ही टीव्ही अभिनेत्री बनली असती आमिर खानची हिरॉईन, 'ठग्स ऑफ हिन्दुस्तान' ची मिळाली होती ऑफर
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 4:49 PM

मुंबई : एक अभिनेत्री गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीत खूप चर्चेत आहे. बॉलीवूड आणि साऊथचे प्रोजेक्ट्स करण्यासोबतच ही अभिनेत्री (actress) वेब सीरिजच्या दुनियेतही सामील आहे. ‘कुमकुम भाग्य’ या टीव्ही शोमधून छाप पाडल्यानंतर ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावर वळली. तिच्या करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्रीने आमिर खानसोबतच्या चित्रपटाची ऑफर नाकारली. ती अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर (Mrunal thakur) . मात्र तिने चित्रपटासाठी का नकार दिला ते जाणून घेऊया.

मृणाल ही मनोरंजन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहे. ती अशा आऊट-ऑफ-द-बॉक्स पात्रांची निवड करते, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि फोटो शेअर करत असते.

मृणाल ठाकूरने आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी नकार दिला होता. मीडिया रिपोर्टनुसार, मृणालने चित्रपटाची ही ऑफर नाकारली कारण यशराज फिल्म्सतर्फे 3 चित्रपटांचा करार केला जातो आणि मृणालला कराराचे बंधन नको होते. ,

मृणालला वाटले की करारावर स्वाक्षरी केल्यानंतर तिला इतर चांगल्या ऑफर मिळू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत तिनेआमिर खानसोबत काम करण्याची संधी सोडली. पण नंतर पडद्यावर चित्रपटाचे नशीब पाहून मृणालला आज तिच्या निर्णयाने आनंद झाला असेल.

मृणालचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी झाला. मृणालने सुरुवातीचे शिक्षण मुंबईतच घेतले. अभिनय कारकिर्दीमुळे मृणालने ग्रॅज्युएशन मध्येच सोडले. मृणालने 2012 मध्ये ‘मुझसे कुछ कहते है ये खामोशियां’ मधील ‘गौरी भोसले’च्या भूमिकेतून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘हर युग में आयेगा एक अर्जुन’मध्ये दिसली होती.

2014 मध्ये मृणाल टीव्ही शो ‘कुमकुम भाग्य’मध्ये श्रिती झासोबत दिसली होती. तिने या शोमध्ये बुलबुल अरोराची भूमिका साकारली होती आणि या शोने तिच्या करिअरला खूप चालना दिली. यासोबतच त्याने काही रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

2014 मध्येच मृणालने मराठी चित्रपटातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘सुपर ३०’, ‘बाटला हाऊस’, ‘जर्सी’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने छाप पाडली. यापूर्वी आलेला तिचा ‘सीता रामम’ हा साऊथचा चित्रपटही विशेष बराच गाजला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.