‘Koo तुमच्या घरासारखे बाकी सगळे भाड्याचे’, ट्विटरवरून निलंबित होताच कूने केले कंगनाचे स्वागत!

मंगळवारी ट्विटरने कंगना रनौत हिच्या ट्विटरवर कायमस्वरुपी बंदी घातली आहे. ट्विटरच्या या कारवाईनंतर कू अॅप (Koo App) कंगनाच्या समर्थनात पुढे आले आहे.

‘Koo तुमच्या घरासारखे बाकी सगळे भाड्याचे’, ट्विटरवरून निलंबित होताच कूने केले कंगनाचे स्वागत!
कंगना रनौत
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 12:36 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (kangana Ranaut) तिच्या बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. ही अभिनेत्री सोशल मीडियावर आपली मत देखील बेधडकपणे मांडताना दिसते आहे. परंतु, कंगनाची ही शैली ट्विटरला आवडलेली नाही. मंगळवारी ट्विटरने कंगना रनौत हिच्या ट्विटरवर कायमस्वरुपी बंदी घातली आहे. ट्विटरच्या या कारवाईनंतर कू अॅप (Koo App) कंगनाच्या समर्थनात पुढे आले आहे (Koo App Welcomes kangana Ranaut on new social media platform).

आता जेव्हा ट्विटरद्वारे कंगनाचे खाते निलंबित केले गेले आहे, तेव्हा त्याचा स्वदेशी पर्याय असणाऱ्या ‘कू’ने या अभिनेत्रीचे जाहीर स्वागत केले आहे. कंगनाच्या विरोधात केलेल्या या कारवाईबाबत ट्विटरने म्हटले आहे की, अभिनेत्रीने ‘वारंवार नियमांचे उल्लंघन केल्याने’ त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

‘कू’मध्ये कंगनाचे स्वागत

Koo app

कू

कूचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अप्रमेय राधाकृष्ण यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कंगनाच्या पहिल्या कू पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यात तिने ‘कु आप घर है’ असं म्हटलं आहे. अश्या परिस्थितीत हे पोस्ट करुन अप्रमेयने अभिनेत्रीला ‘बरोबर’ असे म्हणत दुजोरा दिला आहे. आणि पुढे म्हटले की, ‘कू तिच्या घरासारखे आहे, तर बाकीची भाड्याने घेण्यासारखे आहेत’.

कूच्या या स्वागतामुळे कंगनाचे चाहते खूप खुश झाले आहेत. कंगना ट्विटरप्रमाणेच कू वरही खूप अ‍ॅक्टिव आहे. कू लाँच झाल्यानंतर लगेचच अभिनेत्री यात सामील झाली. या प्लॅटफॉर्मवर कंगनाचे अधिकृत पेज आहे आणि त्यावर तिचे 449K फॉलोअर्स आहेत (Koo App Welcomes kangana Ranaut on new social media platform).

ट्विटरच्या कारवाईवर कंगनाचे प्रत्युत्तर

ट्विटरच्या या कारवाईनंतर अभिनेत्री संतप्त झाली आहे आणि तिने म्हटले आहे की, या व्यासपीठाने तिची मते बरोबर असल्याचे सिद्ध केले आहे. ‘हे गोरे लोक स्वत:ला श्वेत लोकांना गुलाम बनवण्यास पात्र मानतात’. सिनेमासह असे अनेक मंच आहेत. तथापि, ती अशा लोकांचा विचार करत आहेत जे हजारो वर्षांपासून अत्याचार, गुलामगिरी आणि सेन्सॉरशिपचा बळी होत आहेत आणि तरीही त्यांची वेदना संपत नाही.

अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यानंतर कंगना टीएमसीविरोधात अनेक ट्विट करत होती. भाजपला पाठिंबा देत कंगना उघडपणे टीएमसीवर निशाणा साधत होते. गँगरेपचा आरोप करत कंगनाने टीएमसीवर ट्विट केले होते, त्यानंतरच तिचे खाते निलंबित केले गेले आहे.

(Koo App Welcomes Kangana Ranaut on new social media platform)

हेही वाचा :

जेव्हा मिश्रांची लेक भोसलेंच्या घरची सून होते, वाचा संकेत-सुगंधाच्या ‘प्यारवाली लव्हस्टोरी’बद्दल…

Drishyam 2 | ‘दृश्यम 2’च्या घोषणेनंतर अडचणीत सापडला चित्रपट, निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.