Kriti Sanon | तर मला हात पसरून काम मागावं लागलं नसतं… क्रिती सेननचं नेपोटिझमवर मोठं भाष्य

क्रिती सेननने एकदा नेपोटिझमवर भाष्य केले होते. अनेक चित्रपटात स्टारकिड्सनी तिला रिप्लेस केल्याचेही तिने नमूद केले.

Kriti Sanon |  तर मला हात पसरून काम मागावं लागलं नसतं... क्रिती सेननचं नेपोटिझमवर मोठं भाष्य
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 2:57 PM

Kriti Sanon On Nepotism : बॉलीवुड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हिने मनोरंजन विश्वात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2014 मध्ये आलेल्या हिरोपंती चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. एका जुन्या मुलाखतीत क्रितीने घराणेशाही अर्थात नेपोटिझमवर (Nepotism) भाष्य केलं होतं. आऊटसायडर असल्यामुळे तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाल्याचे क्रिती म्हणाली होती.

पण याच क्रितीने तिच्या कठोर मेहनतीच्या जोरावर आता बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले असून तिने तिचे प्रॉडक्शन हाऊसही सुरू केले आहे. अनेकदा स्टारकिड्सने तिला रिप्लेस केल्याचे एका जुन्या मुलाखतीत क्रितीने सांगितलं होतं.

एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत क्रिती म्हणाली होती -मी खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि माझ्यात बरंच चांगलं काम करण्याची क्षमता आहे, हे मला माहीत आहे. मला काही ए-लिस्ट डायरेक्टर्ससोबत काम करायचे आहे. मला (आत्तापर्यंत) काही चांगल्या संधी मिळाल्या आहेत, पण (इतरांशी) तुलना करायची झाली तर आणखी अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या मला खऱ्या आयुष्यात हव्या आहेत. त्या मिळवायला अजून बरंच अंतर पार करावं लागेल. पण दिग्दर्शकांकडे पोहोचायला, त्यांच्या कडे काम मागायला मला काही (कमीपणा) वाटत नाही.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

तर मला हात पसरून मागण्याची वेळ आली नसती

मी जर एखाद्या फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबातून आले असते तर मला कामासाठी हात पसरायची (काम मागायची) वेळ आली नसती. माझी लोकांशी आधीच ओळख झाली असती, कुठे ना कुठे भेटलो असतो आम्ही. पण एका पॉईंटनंतर हे सगळं (ओळखी) नाही तर तुमचं कामच तुमच्यासाठी बोलतं. त्यानेच ओळख मिळते. पण मला तिथे पोहोचायला अजून थओडा वेळ लागेल किंवा जास्त हिट पिक्चर द्यावे लागतील.

स्टारकिडने कले होते रिप्लेस

याबाबत बोलताना क्रितीने कोणाचंही थेट नाव घेणं टाळलं, ती म्हणाली ‘ मला त्यांचं नाव घ्यायच नाही, पण फिल्मी कुटुंबातील असणाऱ्या व्यक्तीनेच (ज्याच्या नावाची खूप चर्चा होती) मला (चित्रपटात) रिप्लेस केलं होतं. हे खरं आहे. त्यामागचं कारण तर मला माहीत नाही, कदाचित दिग्दर्शकाला त्यांनाच कास्ट करायचं असेल’. पण असं बऱ्याच वेळेस झालं आहे. यामुळे त्रास होतो, थोड वाईटही वाटतं. पण एका पॉईंटनंतर तुम्ही (याबद्दल) काय करू शकता ? यश किंवा अपयशात प्रत्येकाचा स्वतःचा वाटा असतो. काही गोष्टी एखाद्या कारणामुळे घडतात आणि एखाद्या कारणामुळे घडतही नाहीत, असे क्रिती म्हणाली होती.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.