ती अभिनेत्रीपेक्षा छिछोरीच वाटते.. शहनाज गिलबद्दल बोलताना अभिनेत्याची जीभ घसरली
अभिनेत्री शहाज गिल हिचा नवाजुद्दीन सिद्दीकसोबतच 'यार का सताया हुआ है' हे लेटेस्ट गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. त्यातील तिच्या कामाचं खूप कौतुकही होत आहे. पण एका अभिनेत्याला मात्र असं वाटत नाही, त्याने शहाजवर टीकास्त्र डागलं आहे.
KKK Tweet On Yaar Ka Sataya Hua Hai : बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेली शहनाज गिल (shehnaaz gill) हिने कठोर मेहनत करत चित्रपटसृष्टीत स्वत:चं एक महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे. बिग बॉस ते सलमान खानच्या (Salman khan) चित्रपटातून पदार्पण असा मोठा पल्ला गाठणाऱ्या शहनाजच्या हातात सध्या बरेच चित्रपट आहेत, ती बरंच कामही करत आहे. प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सोबतचं तिचं ‘यार का सताया हुआ है’ हे गाणंही नुकतंच रिलीज झालं असून तिच्या कामाचं खूप कौतुकही होत आहे. शहनाजचे लाखो चाहते असून ते तिचं अभिनंदन करताना दिसत आहेत. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारही तिचं कौतुक करत आहेत.
मात्र असं असतानाचं एका अभिनेत्याला मात्र तिचं काम फारसं आवडलेलं नसून त्याने शहनाजवर टीकास्त्र सोडलं आहे. केआरके अर्थात कमाल आर खान (KRK) याला ‘यार का सताया हुआ है’ गाणं आवडलं नाही, ना त्यातील शहनाज व नवाजुद्दीनची केमिस्ट्री आवडली. त्या दोघांच्याही केमिस्ट्रीवर त्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.
केआरके ने उडवली शहनाज आणि नवाजुद्दीनची खिल्ली
केआरके प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसतो. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शहनाज गिल त्याचे लक्ष्य आहेत. या दोघआंच्या नवीन व्हिडिओ गाण्यावर प्रतिक्रिया देताना केआरकेने ट्विट केले आहे. ‘आज मी नवाजुद्दीन आणि शहनाज गिलचे गाणे पाहिले. अरे देवा, ते अतिशय भयानक होतं. नवाज डान्स करत आहे आणि शहनाज अभिनेत्रीपेक्षा छिछोरी जास्त वाटते ! या मुलीला अभिनय अजिबात येत नाही” अशा शब्दांत केआरकेने टीका केली आहे.
फॅन्सनी केले केआरके ला ट्रोल
त्याच्या या ट्विटनंतर कमाल आर खानला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नवाजुद्दीन आणि शहनाजच्या चाहत्यांनी केआरके याच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘सर, तुम्ही प्रसिद्ध आणि प्रतिभावान लोकांना सडलेले आणि काळे-पिवळे आणि डबल ड्रम म्हणत आहात… तुम्ही तुमच्या चेहऱ्याबद्दल आणि प्रतिभेबद्दलही काही सांगा… तुम्ही इतरांचे यश पाहू शकत नाही का,’ अशी टीका युजरने केली. तर ‘तू वेडा आहेस का?’ ते गाणं नंबर 1 वर यशस्वीपणे चालू आहे आणि तेही जागतिक स्तरावर.. ! तुम्ही नेहमी इतरांबद्दल वाईट बोलत असता, आधी स्वत:चा चित्रपट बघा, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने त्याला फटकारले आहे. इतर लोकांनीही केआरकेवर टीका करत त्याला चांगलच सुनावलं आहे.