The Kapil Sharma Show | ‘मी अजूनही त्या गोष्टी विसरलो नाहीय’, गोविंदाच्या उपस्थितीमुळे नाराज कृष्णाची गैरहजेरी!

‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात गोविंदाने हजेरी लावली होती.

The Kapil Sharma Show | ‘मी अजूनही त्या गोष्टी विसरलो नाहीय’, गोविंदाच्या उपस्थितीमुळे नाराज कृष्णाची गैरहजेरी!
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 1:16 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांच्यातील वाद आता जगजाहीर आहेत. या वादानंतर त्यांनी एकमेकांशी काम करण्यास नकार दिलेला आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात गोविंदाने हजेरी लावली होती. यावेळी तरी दोघांच्या दरम्यानचे वाद मिटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, नाराज कृष्णाने यावेळी मंचावर येण्यास नकार दिला (Krushna Abhishek refuses to perform on the kapil sharma show episod featuring govinda).

नुकत्याच पार पडलेल्या एका भागात गोविंदाने हजेरी लावली होती. गोविंदाने कपिलच्या मंचावर ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या ‘किसी डिस्को मे जाए’ या प्रसिद्ध गाण्यावर परफॉर्मन्स केला. गोविंदाच्या येण्याने मंचावर  खूप मस्तीचे वातावरण पाहायला मिळाले.

(Krushna Abhishek refuses to perform on the kapil sharma show episod featuring govinda)

कृष्णाची गैरहजेरी

या भागात कृष्णाची गैरहजेरी पाहायला मिळाली. मामा, गोविंदाच्या येण्याने नाराज झाल्याने कृष्णाने चित्रीकरण करण्यास नकार दिल्याचे कळत होते. मात्र, कृष्णाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तपत्राला कृष्णाने मुलाखत दिली. तो म्हणाला, ‘चीची मामा सेटवर येणार, ही गोष्ट मला केवळ 10 दिवसांपूर्वी कळली. त्यांच्यासोबत सुनिता मामी येणार नव्हती. शोच्या टीमला ही गोष्ट समजल्यावर, मला याने काहीच फरक पडणार नाही, असे त्यांना वाटले. मात्र, काही वर्षांपूर्वी जेव्हा त्या या मंचावर आल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्यासमोर कोणतेच स्कीट करू नये, अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच मी यावेळीही त्यांच्यासमोर आलो नाही.’(Krushna Abhishek refuses to perform on the kapil sharma show episod featuring govinda)

‘माझे आणि मामाचे फार छान नाते होते. मात्र, जेव्हा दोन लोकांच्या नात्यात फूट पडते तेव्हा त्यांच्यासमोर विनोद करणे कठीण असते. कारण विनोद निर्मितीसाठी सेटवर हलके फुलके वातावरण असणे गरजेचे असते. मी त्याला एक छानशी मानवंदना दिली असती. आणि आणखी बरीच कमाल दाखवू शकलो असतो. मात्र, यावेळी मी ते टाळले.’

(Krushna Abhishek refuses to perform on the kapil sharma show episod featuring govinda)

वादाचे कारण…

या प्रकरणात गोविंदा यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या काही वर्षांपासून गोविंदा आणि कृष्णाच्या कुटुंबात मतभेद सुरू होते. वृत्तानुसार, काश्मिरी शाह (कृष्णा अभिषेकची पत्नी) यांनी एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘काही लोक पैशासाठी नाचतात’. हे वाचून सुनीताला (गोविंदाच्या पत्नीला) वाटले की, ती गोविंदाला उद्देशून असे म्हणत आहे. यामुळे त्या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि तेव्हापासून या दोन्ही कुटुंबाचा एकमेकांमधील संवाद बंद आहे. 2019मध्ये या कार्यक्रमात गोविंदाने पत्नी सुनीता आणि मुलगी टीना आहूजासमवेत हजेरी लावली होती. तेव्हाही कृष्णा अभिषेक त्या भागातून गायब होता. पुन्हा एकदा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.(Krushna Abhishek refuses to perform on the kapil sharma show episod featuring govinda)

(Krushna Abhishek refuses to perform on the kapil sharma show episod featuring govinda)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.