कुणाल कामराविरोधात राहुल कनालकडून पोलिसांत तक्रार; केले गंभीर आरोप
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर राहुल कनालने खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कनालने कामरावर गंभीर आरोप केले आहेत, कामराला दहशतवादी संघटनांकडून पैसे मिळण्याचा आरोप कनालने केला आहे. तसेच असे अनेक गंभीर आरोप कनालकडून करण्यात आले आहेत.

स्टॅंडअप कॉमेडिअन कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेल्या एका गाण्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला. त्याला पोलीस चौकशीसाठी समन्सही पाठवण्यात आलं आहे. हा वाद आत आणखी वाढणार असंही दिसून येत आहे. कारण आता कुणाल कामराविरोधात राहुल कनालने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राहुल कनालचे कामरावर अनेक गंभीर आरोप
राहुल कनालने कामरावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दहशतवादी संघटना कुणाल कामराच्या यूट्युब चॅनलला पैसे देतात. असा आरोप कनालने केला आहेत .तसेच राहूल कनाल याने पोलिसांकडे कुणाल कामराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.राहुल कनालने याबाबत माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “कुणाल कामरा प्रधानमंत्री , अर्थमंत्री, गृहमंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्व मोठ्या नेत्यांवर बोलतो. ‘हम होंगे कमयाब’ असं देशाचं गाणे आहे त्याला या कामराने ‘हम होंगे कंगाल’ असं बनवलं आहे हे आक्षेपार्ह आहे. कॅनडा, USA, पाकिस्तान मधून 400 डॉलर 300 यूरो पैसे कुणाल कामराला पाठवण्यात आले आहेत. ” असं म्हणत कनालने थेट रक्कमच सांगून टाकली.
दहशतवादी संघटनेकडून कामराला पैसे दिले जातात
पुढे कनालने म्हटंल “मेहनत करून पैसे कमावणे वेगळं आहे परंतु यांना मिळणारे पैसे हे वेगळी इन्कम आहे ज्याला टीप म्हणतात. एक दिवसापूर्वीच 400 डॉलर त्यांना देण्यात आले आहेत. अशापद्धतीने दहशतवादी संघटनेकडून त्याला पैसे दिले जात आहेत. पत्राची हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी मुंबई पोलिसांना दिली आहे. मुंबई पोलिस आता यूट्युब चॅनलला पत्र देत आहेत आणि आमचे वकील सुद्धा त्याला पत्र देणार आहेत. 24 तासात यूट्युबवर कारवाई झालीच पाहिजे. यूट्युबने असे अकाऊंट बंद केले पाहिजेत”अशी मागणी राहुल कनालने केले आहेत .
मला कुणाल कामराने कॉल केला होता त्याच्याशी माझा बोलणं झालं….
“पैशाचा बॅकअप आणि पॉलिटिकल बॅकअप यात फरक आहे. 75 दिवसापूर्वी 3 जानेवारीला हे रेकॉर्ड केले आणि आता मार्च मध्ये बाहेर आलं याला इतके दिवस का लागले? मला कुणाल कामराने कॉल केला होता त्याच्याशी माझा बोलणं झालं. हे 1.5 ते 2 करोड अशा पैशांसाठी केलेलं काम आहे ते पोलिस लवकरच सिद्ध करून दाखवतील” असा विश्वासही कनालने व्यक्त केला आहे.
राहुल कनालने केलेल्या तक्रारीनंतर आणि कामराव केलेल्या गंभीर आरोपांवरून आता कामराच्या अडचणी वाढणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.