बॉलिवूड अभिनेत्री हीना खान गेले अनेक दिवस सोशल मीडियापासून लांब होती. वडिलांचं निधन झाल्यानंतर हीनाची कोरोना चाचणीसुद्धा पॉझिटिव्ह आली.
आता अनेक दिवसांनंतर हीनानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. गेले अनेक दिवस ती ‘डॅडीज स्ट्राँग गर्ल’ असं म्हणत वडिलांसोबतचे फोटो शेअर करतेय.
आता हीनाचं हे नवं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतंय.
नुकतंच हीनाचं पथ्थर वारगी हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहचली.