कमबॅकसाठी करण जोहरच्या पार्टीत जा, क्वान कर्मचाऱ्याची ऑफर, सुचित्रा कृष्णमूर्तीचा खळबळजनक दावा

काम मिळवण्यासाठी करण जोहरच्या पार्ट्यांमध्ये दिसावेच लागते, क्वानच्या महिला कर्मचाऱ्याची अभिनेत्रीला ऑफर (Kwan company employee offer me to join karan johar party for film says suchitra krishnamoorthi)

कमबॅकसाठी करण जोहरच्या पार्टीत जा, क्वान कर्मचाऱ्याची ऑफर, सुचित्रा कृष्णमूर्तीचा खळबळजनक दावा
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 3:55 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू तपासादरम्यान समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे ‘क्वान’ (Kwan company) टॅलेंट कंपनी सध्या खूप चर्चेत आली आहे. जया साह, दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश, रिया चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूत या सगळ्यांचा क्वान टॅलेंट कंपनीशी काहीना काही कारणाने संबंध आहे. याच सगळ्या दरम्यान आता ही कंपनी आणखी एका कारणासाठी चर्चेत आली आहे. अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीने (suchitra krishnamoorthi) क्वान कंपनीच्या कर्मचाऱ्याने कमबॅकसाठी करण जोहरच्या पार्टीत जाण्याची ऑफर दिल्याचा धक्कादायक दावा केला आहे. (Kwan company employee offer me to join karan johar party for film says suchitra krishnamoorthi)

क्वान कंपनीच्या (Kwan company) एका कर्मचाऱ्याने सुचित्राला पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीत कमबॅक करण्याचा सल्ला दिला होता. यावर तिने, माझी मुले अजून लहान आहेत आणि इतक्यात कमबॅक करणे कठीण असल्याचे म्हटले. यावर त्या कर्मचाऱ्याने सुचित्राला चित्रपट मिळवण्यासाठी केवळ करण जोहरच्या पार्टीत सामील व्हावे लागते, त्यामुळे कमबॅकसाठी तिनेदेखील तेच करावे, अशी ऑफर दिली असल्याचा खळबळजनक दावा सुचित्रा कृष्णमुर्तीने (suchitra krishnamoorthi) केला आहे.

काम हवे तर करण जोहरच्या पार्टीत सामील व्हावे लागते

‘मी एका बुकिंग एजंटशी बोलत होते. ही महिला कर्मचारी अभिनयाची कामेदेखील सांभाळते. तिने मला अभिनय करण्याचा सल्ला दिला. माझी मुलगी लहान असल्याने, पुढे बघू, असे उत्तर मी तिला दिले. यावर काम मिळवणे सोपे नसते, आणि महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी तुला करण जोहरच्या (Karan Johar) पार्ट्यांमध्ये दिसले पाहिजे, असा सल्ला तिने दिला’, असे सुचित्राने (suchitra krishnamoorthi) म्हटले.

यावेळी तिने बॉलिवूड ड्रग्जप्रकरणावर देखील भाष्य केले. बॉलिवूड बऱ्याच गोष्टींबाबातीत गप्प असते, इथे केवळ तू माझे नाव घेतलेस, तर मी तुझे नाव घेईन, असा प्रकार चालत असल्याचे म्हणत, तिने आपला रोष व्यक्त केला. (Kwan company employee offer me to join karan johar party for film says suchitra krishnamoorthi)

कोण आहे सुचित्रा कृष्णमुर्ती?

सुचित्रा कृष्णमूर्ती (suchitra krishnamoorthi) गायिका – अभिनेत्री असून, तिने शाहरुख खानसह ‘कभी हा कभी ना’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला होता. याशिवाय सुचित्रा जॉन अब्राहमसोबत ‘रोमियो अकबर वॉल्टर’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिने कामातून ब्रेक घेतला होता.

संबंधित बातम्या :

ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स

(Kwan company employee offer me to join karan johar party for film says suchitra krishnamoorthi)

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.