Lata Mangeshkar : मुंबईतील या मार्गाने निघणार लतादिदींची अंत्ययात्रा, पंतप्रधान मोदी मुंबईत येणार
दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर 6.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि लतादीदींचं बहिण भावाचं नातं होतं. मोदी पंतप्रधान व्हावेत अशी जाहीर इच्छाही लतादीदींनी बोलून दाखवली होती. आज लतादीदींचं निधन झाल्याने मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मुंबई : लतादिदींच्या (Lata Mangeshkar) जाण्याने आज संपूर्ण देश पोरका झाला आहे. त्यांचा आवाज नेहमीच आपल्या कानावर राहणार आहे. देशभरातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली (RIP lata mangeshkar) वाहण्यात येत आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव ब्रिज कँडहून निघालं आहे. पंतप्रधान मोदीही (Pm modi) मुंबईला रवाना झाले आहेत. लतादिदींची त्यांची अंत्ययात्र निघणार आहे. त्यांच्या “प्रभुकुंज ” निवास इथून लता दीदींची अंत्ययात्रा – महालक्ष्मी कॅडबरी जंक्शन– हाजी अली जंक्शन–हाजी अली– वरळी सी फेस रोड– वरळी अॅट्रिया मॉल, वरळी नाका– पोद्दार हॉस्पिटल–दूरदर्शन सिग्नल–वरळीकर चौक– सिद्धिविनायक मंदिर– इंदू मिल–चैत्यभूमी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान, अशी निघणार आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या भागात लोक जमत आहेत.
या मार्गाने अंत्ययात्रा
छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात पोलिसांचा फौजफाटा
दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर 6.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि लतादीदींचं बहिण भावाचं नातं होतं. मोदी पंतप्रधान व्हावेत अशी जाहीर इच्छाही लतादीदींनी बोलून दाखवली होती. आज लतादीदींचं निधन झाल्याने मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दुपारी साडेचार वाजेपर्यंत मोदी मुंबईत येऊन लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. लतादीदी यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्कच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिनाताई ठाकरे स्मृती मार्गापासून पार्कपर्यंत जाणारा रस्ता बॅरीकेटींग लावून बंद केला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 वाजता छत्रपती शिवाजी पार्कवर दाखल होणार आहेत, याचसोबत आणखी काही व्हीव्हीआयपी व्यक्ती दाखल होणार असल्याने विशेष खबरदारी घेतली जातीये.
लतादिदींच्या आठवणी
लता मंगेशकर यांना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर शांता शेळके यांनी ‘लता’ या पुस्तकाचे संकलन केले. हे पुस्तक मंगेशकर ट्रस्टने प्रकाशित केले. त्यात नौशाद, आशा भोसले, प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगुळकर, वि. वा. शिरवाडकर, पंकज मलिक, भालजी पेंढारकर, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, कुमार गंधर्व, सचिनदेव बर्मन, हृदयनाथ मंगेशकर, मजरुह सुलतानपुरी, रामूभैया दाते यांचे लेख आहेत. या मान्यवरांनी पुस्तकात आपल्याला माहित नसणाऱ्या लतादीदींचे किस्से, अनुभव सांगितलेत. ‘लग जा गले…’ 58 वर्षांपूर्वी हे गाणं आलं आणि या गाण्याने श्रवणीय कानांचा ठाव घेतला तो आजतागायत… हे गाणं ऐकलं नाही असं क्वचितच कुणी असेल. या गाण्याचे शब्द, चाल, संगीत आणि विशेष म्हणजे लतादिदींच्या आवाजाने तर या गाण्याला चार चांद लावले.