मुंबई – भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आत्तापर्यंत अनेक आजरामर गाणी गायली, तेही अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच गायलेली गाणी इतकी प्रसिध्द झाली आहेत. की आजही लोक ती गाणी ऐकण्यामध्ये गुंग झालेली असतात. सुमधूर गाण्यांमधून संपुर्ण देशाला त्यांनी वेड लावलं आहे. मराठी, हिंदी अशा एकूण वीस भाषांमध्ये त्यांनी गायली आहेत. सगळी गाणी सुपरहिट (superhit song) आहेत. ‘तुम आ गए हो, नूर आ गया है..’, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा…’ या अशा गाण्यांवर आजही त्यांच्या चाहत्यांचं तेवढचं प्रेम आहे. 28 सप्टेंबर 1929 मध्ये लता दीदींचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर (madhyapradesh indur) येथे झाला. तसेच वडिलांनी लहानपणापासून संगीताची आवड निर्माण करून त्यांना त्या पध्दतीनं शिक्षण दिलं. त्यांच्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये आई आणि लेकीसाठी सुध्दा आवाज दिला आहे ते थोडक्यात पाहूया.
पहिली जोडी
लता दीदींनी आरजू (1965) चित्रपटातील अभिनेत्री बबिता हिच्यासाठी ‘बेदर्दी बलमा तुझको मेरा मन याद करता है’ हे गाणे गायले होते. त्यानंतर लता दीदींनी ‘मेघा’ चित्रपटातील ‘कुछ लोग जीती बाजी’ या चित्रपटात त्यांची मुलगी करिश्मासाठी हे गाणे गायले होते. त्यानंतर लता मंगेशकर यांनी बेवफा (2005) चित्रपटात बबिता यांची दुसरी मुलगी करीना कपूरसाठी ‘कैसे पिया से मैं कहूं की मुझे कितना प्यार है’ हे गाणे गायले.
दुसरी जोडी
लता मंगेशकर यांनी (1968) मध्ये इज्जत चित्रपटात अभिनेत्री तनुजासाठी ‘ये दिल तुम बिन लगता नहीं’ हे गाणे गायले होते. त्यानंतर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटात काजोलने ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे गाणे गायले होते.
तिसरी जोडी
लता मंगेशकर यांनी ‘मौसम’ (1975) चित्रपटातील अभिनेत्री शर्मिला टागोरसाठी ‘चडी रे चडी, कैसी गले में पडी’ हे गाणे गायले होते. त्यानंतर लता दीदींनी रंग दे बसंती चित्रपटातील सोहा अली खानसाठी ‘लुका-छिप बहू हुई, साने आजा’ हे गाणे गायले.
चौथी जोडी
लता मंगेशकर यांनी ‘बॉबी’ चित्रपटातील अभिनेत्री डिंपल कपाडियासाठी ‘मुझे कुछ कहना है, मुझे भी कुछ कहना है’ हे गाणे गायले होते. त्याचवेळी लता दीदींनी ‘जब प्यार किसी से होता है’ चित्रपटातील ट्विंकल खन्नासाठी ‘मधोश दिल की धडक’ हे गाणे गायले.