लता मंगेशकरांचे गाणे आपल्याला कितीही आवडले तरी आपण ‘क्या कमाल कि गाती है’ असं नाही म्हणू शकत, का ते जाणून घ्या

| Updated on: Feb 06, 2022 | 2:27 PM

लता मंगेशकर यांचे गाणे ऐकल्यानंतर कुणी असं म्हणणार नाही 'अरे यार क्या कमाल का गाती है.' लतादीदींचे गाणे कुणीही ऐकलं तरी त्यांच्याबद्दल आपोआपच आपल्या मनात एक आदराची भावना निर्माण होते, ती त्यांच्या गाण्यासाठी. जसा आपल्या पूर्वजांचा आपल्याला वारसा आहे तसाच गायिकीमध्येही धृपद, ख्याल, भजन, ठुमरी हा ही एक सांगितिक वारसा लाभला आहे.

लता मंगेशकरांचे गाणे आपल्याला कितीही आवडले तरी आपण क्या कमाल कि गाती है असं नाही म्हणू शकत, का ते जाणून घ्या
Follow us on

मुंबईः लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे गाणे (Songs) ऐकल्यानंतर कुणी असं म्हणणार नाही ‘अरे यार क्या कमाल का गाती है.’ लतादीदींचे गाणे कुणीही ऐकलं तरी त्यांच्याबद्दल आपोआपच आपल्या मनात एक आदराची भावना निर्माण होते, ती त्यांच्या गाण्यासाठी. जसा आपल्या पूर्वजांचा आपल्याला वारसा आहे तसाच गायिकीमध्येही धृपद, ख्याल, भजन, ठुमरी हा ही एक सांगितिक वारसा लाभला आहे. आपण जर मागील शंभर वर्षातील भारतीय चित्रपटाचा (Indian Cinema) इतिहासात डोकावून बघितलं, तर त्या काळातील गाणी ऐकली तर लक्षात येईल की, त्या त्या काळाला लतादिदींचा चित्रपटांना मिळालेला आवाज म्हणजे एक आशीर्वाद आहे. मागील काही दशकात अनेक दिग्गजांनी गायिकीमध्ये कमालीचे काम केले आहे. त्यामध्ये मग बडे गुलाम अली खॉं, अमीर खॉं साहेब आणि किशोरी अमोणकर यांनी संगीत क्षेत्रात खूप मोठं काम करुन ठेवलं आहे. पण त्यांची प्रत्येकाची गाणी ही त्यांच्या स्वतःसाठी होती. आणि इथूनपासूनच लता मंगेशकर यांच्या गायिकीचा एक वारसा सुरु होतो.

दुसऱ्यांचा आवाज बनून गायिकी करणं म्हणजे कमालीची गोष्ट असते. तिच खरी कमालीची गोष्ट म्हणजे लता मंगेशकर यांचे गाणे आहे. सहगल उच्च दर्जाचा गायक असला तरी तो कधी दुसऱ्याचा आवाज होऊ शकला नाही. त्याचं गाणं बहुपदरी असूनही ते त्याच्यासाठीच राहिलं आहे.लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे चंद्रवर पोहचलेलं गाणं आहे. ते नील आर्मस्ट्ऱॉंग सारखं आहे. ज्यानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्याचं स्वप्न साकार केलं. आणि त्यााच यानात दुसऱ्या खिडकीत बसलेलं कोण असेल तर ती म्हणजे आशा भोसले.

गाणं लता मंगेशकर यांचं होऊन जातं

लता मंगेशकर यांची गायिकीतील काही गोष्टी या आश्चर्यकारक वाटणाऱ्या असतात. उदाहरणार्थ कथा, व्यक्तिरेका, चित्रपट, संगीत आणि गीत मग ते कुणाचेही असले तरी त्याला लतादींदीचा आवाज लाभला तर मग ते गाणं लता मंगेशकर यांचंच होते. त्यांच्या गाण्यानंतर मग कोणतीच गोष्ट उरत नाही, आणि त्या गोष्टीना मग महत्वही राहत नाही. हिच एक भारतीयांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा आवाज, चाल आणि त्यासाठी केलेली तयारी ही अत्युच्च पातळीवरचीच असते. समर्पण म्हणजे काय असते ते शिकावं ते लतादीदीं यांच्याकडूनच. म्हणूनच त्यांची गायकी इतरांपेक्षा वेगळी ठरते ती यामुळेच. त्यांच्या गायिकेत शतकानुशतके वेगळेपण जाणवत आले आहे कारण, त्यांची एक वेगळी अदा आहे आणि वेगळी शैली आहे, आणि गाण्याची वेगळी कला आहे. किंवा या सगळ्याचं मिळून एक वेगळं मिश्रण आहे.

हे गाणं म्हणजे सुगंधित फुलांचा गालिचा

लतादीदींचं गाणं म्हणजे अरेबियन नाईटस् मधल्या कथांसारखं आहे. ज्या कथांनी कैक वर्षे अखंड मानव जातीला भूलवून आणि खेळवून ठेवलं, ज्या कथांनी सुंदर असा फुलांचा गालिच्छा पसरला आहे, तसा आणि त्या कथांसारखा लता मंगेशकर यांची गाण्यांनी एक सुंदर गालिच्छा पसरला आहे. आणि त्या गालिच्छावर गेली 50 ते 60 वर्षे माणसं त्या गालिच्छाचा आनंद घेत आहेत.

सूर कितीही जटिल असले तरी दीदींच्या गाण्यात सहजता

लता मंगेशकर यांचं ‘रसिक बलमा’ तुम्ही ऐकलं असाल तर तुम्हाला संमोहित होणं काय असतं ते कळेल. लहान मुलं जशी जादू टोण्याच्या खेळात रंगून जातात, तसच लतादिदींचं गाणं ऐकले की आपणही मग त्यात रंगून जातो.
संगीतकार सलीलदासारख्या गुंतागुंतीच्या सुरांची निर्मिती करणार्‍या, बनारससारख्या शहरातल्या गजबजलेल्या रस्त्यासारखी सूर निर्माण केले तरीही लता मंगेशकर त्या गजबजलेल्या रस्त्यांनी निवांतपणे फिरतात. ‘ओ सजना बरखा बहार आई’ ही ही अशीच एक रचना आहे, जी एका जटिल आणि अवघड जागांनी भरली आहे, पण ती लतादिदींच्यामुळे सहजतेने आली आहे.

‘आपकी आंखों में कुछ महके हुए से राज हैं’ उंची लाभलेलं गाणं

गुलजार आपल्या गीताची आठवण सांगताना म्हणतात की, जेव्हा ‘घर’या सिनेमाच्या गाण्याची तालीम आम्ही करत होतो तेव्हा ‘आपकी आंखों में कुछ महके हुए से राज हैं’या ओळीनंतर आलेली ‘आपकी बदमाशियों के ये नये अंदाज हैं’या ओळीबद्दल मी प्रचंड नाराज होतो. त्यावेळी संगीतकार पंचम मला म्हणाले ‘शायरी में बदमाशी कैसे चलेगी? आणि म्हणाले फिर ये लता दीदी गाने वाली हैं.’त्यावर मी त्यांना म्हणालो तुम्ही ही ओळ आहे तशीच ठेवा, लताजींना नाही आवडलं तर मग मी काढून टाकतो. त्यानंतर त्या गाण्याच्या रेकॉर्डींगनंतर जेव्हा मी विचारलं की, गाणं कसं वाटलं तुम्हाला, चांगलं वाटलं ना. त्यावेळी माझ्यासोबत बोलताना त्या म्हणाल्या हां अच्छा था, आणि ती ‘वह बदमाशियों वाली लाईन?’असं विचारल्यावर त्या म्हणाल्या की, अरे तिच तर त्या गाण्यातील खास ओळ आहे. त्यामुळे तर हे गाणं वेगळं झालं आहे, आणि त्या ओळीमुळेच गाण्यात मज्जा आली आहे. ते गाणं ऐकताना तुमच्या लक्षात येईल की, त्यांच्या खनकदार हसण्यानं त्या बदमाशियों सारख्या शब्दाचा वापर करतात, आणि त्या त्यांच्या गाण्यातील भावनेला मग आणखी एका उंचीवर नेऊन ठेवतात.

लता दींदीचे गाणं म्हणजे नशिबवान शतक

गीतकार गुलजार हे सांगताना म्हणतात, गेल्या शतकातील आपण सगळेजण नशिबवान आहोत कारण, लतादिदींच्या आवाजाला आम्ही जवळून बघितले आहे आणि जवळून ऐकलेही आहे. लता मंगेशकर यांच्यासाठी मला लिहिता आले हे माझ्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट मानतो मी. आम्ही त्यांची गाणी ऐकून कुणी असे नाही म्हणू शकत की, अरे यार क्या कमाल का गाती हे. आणि आपण असं म्हणूही शकत नाही आणि करूही शकत नाही. त्यांचे संगीत आणि गाणं ऐकून अत्युच्च पातळीवरचाच आनंद आपण घेत असतो. त्यांचं गाणं ऐकलं की, त्यांच्याविषयीचा आदर आपोआप आपल्या मनात तयार होतो. त्यांच्या कोणत्याच गाण्यासाठी आपण अपशब्द नाही वापरू शकत नाही. त्यांच्या गाण्यात आणि आवाजात आपल्याला कोणतीच शंका घेता येत नाही. त्यांचे गाणं म्हणजे उत्स्फूर्त आणि आतून आलेल्या प्रार्थनेसारखं आहे, ते नेहमीच आपल्या कानात आणि मनात गुणगुणावे असे वाटते.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं,डॉक्टरांची माहिती

Lata Mangeshkar health update : लता मंगेशकरांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास, व्हेंटिलेटरवर ठेवले

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात Jio Network Down, त्रांत्रिक कारणांमुळे कॉलिंग, इंटरनेट सेवा ठप्प